Join us

Amruta Khanvilkar : "पहाटे 4 वाजता दरवाजा उघडला आणि..."; अमृताने घेतलं महाकालेश्वराचं दर्शन, भस्म आरतीचाही अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 17:32 IST

Amruta Khanvilkar : उज्जैनमधील प्रसिद्ध महाकालेश्वराच्या दर्शनसाठी अमृता आईसह गेली होती. तिने महाकालेश्वराच्या पहाटेच्या भस्म आरतीचा देखील अनुभव घेतला.

अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. एकापेक्षा एक हिट सिनेमे देऊन अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. अमृताच्या अप्रतिम डान्सचे देखील अनेक जण चाहते आहेत. तिच्या अदा पाहून लोक घायाळ होतात. अमृता खानविलकर सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अभिनेत्री नुकतीच तिच्या आईबरोबर देवदर्शनासाठी गेली आहे. 

उज्जैनमधील प्रसिद्ध महाकालेश्वराच्या दर्शनसाठी अमृता आईसह गेली होती. तिने महाकालेश्वराच्या पहाटेच्या भस्म आरतीचा देखील अनुभव घेतला. महाकालेश्वराच्या दर्शनाचे काही फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. अभिनेत्रीने यावेळी पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. तसेच गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली आहे. तिचा हा लूक लक्ष वेधून घेतोय. अमृताची आई देखील दर्शनाच्या वेळी तिच्या सोबत होती. 

अमृता खानविलकरने भस्म आरतीचा अनुभव शेअर करत व्हिडीओ पोस्ट केला आहे. "मी उज्जैनमधील महाकालेश्वराचं दर्शन घेतलं. तिथली भस्म आरती अनुभवली. मनापासून सांगते तुम्ही महादेवाचे भक्त असाल किंवा नसाल पण आयुष्यात एकदा तरी महाकालेश्वराची ही भस्म आरती नक्की अनुभवावी. कारण या आरतीमध्ये इतकी ताकद आणि इतका नाद आहे जो तुम्हाला नि:शब्द करतो."

"मी आणि माझी आई साधारण रात्री 1 वाजता लाईनमध्ये उभ्या राहिलो. पहाटे 4 वाजता दरवाजा उघडला आणि आम्हाला नंदी कक्षेत बसण्याची संधी मिळाली. तिथून आम्ही 2 तासांची संपूर्ण आरती पाहिली, अनुभवली. आमचं अप्रतिम दर्शन झालं. तुम्ही जर कधी येथे यायचा विचार केला नसेल तर तो प्लीज करा आणि इथली भस्म आरती नक्की अनुभवा" असं अमृताने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :अमृता खानविलकरमराठी अभिनेतामराठी चित्रपट