Join us

"घर बूक केलं आणि आईची ओपन हार्ट सर्जरी", अमृता खानविलकरनं सांगितला घर घेतानाचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 14:41 IST

काही महिन्यांपूर्वी अमृता नवीन घरात शिफ्ट झाली आहे.

Amruta Khanvilkar New Home: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही तिच्या अभिनयानं आणि नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. अमृताने गेल्या वर्षी २०२४ मध्ये मुंबईत नवीन घर घेतलं होतं. काही महिन्यांपूर्वी अमृता नवीन घरात शिफ्ट झाली आहे. आपल्या मेहनतीच्या बळावर कमावलेल्या पैशातून तिनं हे घर घेतलं आहे. त्यामुळे हे खूप खास आहे. नुकतंच अमृतानं घर घेण्याच्या प्रवासावर भाष्य केलं.  

अमृता खानविलकरनं तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिनं चाहत्यांना आपल्या घराची झलक दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, "या घराने मला समज, हिंमत दिली. व्यावहारिक, आर्थिक आणि भावनिकरित्या मला मजबूत केलं. मला कधीच वाटलं नव्हतं की मी परत असं काही विश्व उभं करेन. पण, देव तुमची मेहनत पाहात असतो. तुम्ही काय करताय हे तो पाहात असतो आणि पुन्हा तो तुम्हाला काहीतरी देतो".

ती म्हणाली, "मला आठवतंय एकवेळी आली होती, जेव्हा मला आणि हिंमाशूला आमचं घर भाड्यानं द्यावं लागलं होतं. तेव्हा असं झालं होतं की पुन्हा घर नकोच. किरायाच्या घरात राहूया आणि मी राहिलेही तीन वर्ष. काही नव्हतं तेव्हा माझ्याकडे. अगदी 'चंद्रमुखी' सिनेमा ५० दिवस थिएटरमध्ये सुरू होता पण, खरंच सांगते तेव्हाही माझ्याकडे पैसे नव्हते.  मला वाटतं घराच स्वप्न पुर्ण होत नाही, तोपर्यंत ते तुम्हाला सोडून जात नाही. घर घेणं खूप अवघड आहे. मागच्यावर्षी मी घर बूक केलं आणि आईची प्रकृती बिघडली. तेव्हा आपलं काही चुकलंय का? आपण घर घेतलं आणि आईची ओपन हार्ट सर्जरी करावी लागली, असं वाटतं होतं. पण, सगळं व्यवस्थित पार पडलं. आमची आई बरी झाली.  वेळेच्या आधी घराचा ताबा मिळाला, कोण देतं मुंबईत, रखडून ठेवतात नाहीतर", या शब्दात अमृतानं आपल्या भावना व्यक्त केल्या. 

 अमृतानं  तिच्या घराचं नाव 'एकम' ठेवलंय. अमृताच्या घराची अखंड टोटल ही एक येते. त्यामुळे एक हा नंबर तिच्यासाठी खूप स्पेशल आहे.  अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती सध्या  'सुशीला-सुजीत' सिनेमातील आयटम साँग चिऊताई चिऊताई दार उघडमुळे चर्चेत आहे. सगळीकडे या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. तर त्याआधी अमृता 'लाईक आणि सबस्क्राईब' सिनेमात झळकली होती. यामध्ये तिच्याबरोबर अमेय वाघ, शुभंकर तावडे, राजसी भावे हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.

टॅग्स :अमृता खानविलकरमुंबईसुंदर गृहनियोजन