Join us

दुरुनच नमस्कार...! अमृता खानविलकरच्या कॅप्शनने चाहते संभ्रमात; नक्की कोणावर साधला निशाणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 16:53 IST

अमृताच्या या फोटोवर अभिनेत्री श्रेया बुगडे आणि सायली मराठे यांनी कमेंट करत लिहिले...

मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सध्या यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. तिचं कोणतंही गाणं असो किंवा मग चित्रपट अमृता सर्वांचीच लाडकी बनली आहे. अमृताने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोखाली तिने दिलेले कॅप्शन सध्या चर्चेत आहे.

लाल रंगाचा ड्रेस, मोठे कानातले, केसात माळलेला सुंदर गजरा अशा लुकमध्ये अमृताने छानसा फोटो शेअर केला आहे. कोणत्यातरी कार्यक्रमातील स्टेजवरचा हा फोटो दिसून येतोय. बॅकग्राऊंडला अमृताचे 'चंद्रा' भूमिकेतील मोठे पोस्टर लावलेले दिसत आहे. या फोटोत स्टेजवरुन अमृता हसतच सर्वांना नमस्कार करताना दिसत आहे. अतिशय सुरेख असा हा फोटो आहे मात्र याखालचे कॅप्शन त्याहून इंटरेस्टिंग आहे. 

फोटोला अमृताने कॅप्शनमध्ये लिहिले, 'कभी कभी कुछ लोगों को दूर से ही हाथ जोड़ना अच्छा होता हैं'!

तर लगेच अमृताच्या या फोटोवर अभिनेत्री श्रेया बुगडे आणि सायली मराठे यांनी 'बरोबर' अशी कमेंट केली आहे. आता असं कॅप्शन टाकून अमृताने नेमका कोणावर निशाणा साधला आहे का याचा चाहते अंदाज लावत आहेत. अमृता लवकरच आगामी 'कलावती'या सिनेमात दिसणार आहे. नुकतीच ती सिनेमाचे शूट संपवून लंडनवरुन परतली आहे. 

टॅग्स :अमृता खानविलकरमराठी चित्रपटमराठी अभिनेताव्हायरल फोटोज्