Join us

वडिलांच्या आठवणीत आकाश भावूक, सांगितला 'तो' डोळ्यात पाणी आणणारा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 08:50 IST

आज आकाशने मिळवलेलं हे यश पाहण्यासाठी त्याचे वडील नाहीत.

'सैराट' फेम आकाश ठोसर (Akash Thosar) सध्या आगामी 'घर बंदुक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) सिनेमामुळे चर्चेत आहे. अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातून आणि सिनेमाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या या मुलाने 'सैराट' मधून अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं. नंतर तो 'एफयू', 'झुंड' या सिनेमात झळकला. आता पुन्हा आकाश नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. त्यामुळे चाहते उत्सुक आहेत. आज आकाशने मिळवलेलं हे यश पाहण्यासाठी त्याचे वडील नाहीत. वडिलांच्या आठवणीतला एक किस्सा त्याने नुकताच एका मुलाखतीत सांगितला आहे.

कुस्तीची आवड असलेला आकाश अपघातानेच अभिनय क्षेत्रात आला आणि पहिल्याच सिनेमातून स्टार झाला. आकाशने अभिनेता व्हावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत आकाश म्हणाला, 'एकदा मी ट्रेनने प्रवास करत होतो आणि माझे बाबाही त्याच ट्रेनमध्ये होते. पण मला याची कल्पना नव्हती. घरी येऊन ते आईला बोलले आपला मुलगा किती छान दिसतो. त्याला चित्रपटात घेतलं पाहिजे. आता माझे वडील तर आमच्यात नाहीत पण आईने मला ही आठवण सांगितली.'

आकाश पुढे म्हणाला, 'आईने ही आठवण सांगितल्यावर मला खूपच भारी वाटलं. त्याचं स्वप्न आणि त्यांचीच पुण्याई आहे ज्यामुळे मी आज इथवर पोहोचलो आहे.'

आकाशने सांगितलेली ही आठवण खूपच भावूक करणारी आहे. आगामी 'घर बंदुक बिरयानी' सिनेमा आज 7 एप्रिल रोजी रिलीज झाला आहे. यामध्ये नागराज मंजुळे यांनी देखील अभिनय केला आहे तर सयाजी शिंदे, आकाश आणि सायली पाटील मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :आकाश ठोसरनागराज मंजुळेपरिवार