राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झालं आहे. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या आज बारामती येथे सभा होणार होत्या त्या सभांसाठी आज सकाळी अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामती येथे येत होते. हे विमान बारामती विमान तळावर उतरत असताना अपघात होऊन जवळच्या शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर लोकप्रिय गायक सलील कुलकर्णींना मोठा धक्का बसला आहे.
सलील कुलकर्णी यांनी पोस्ट शेअर करत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. "विश्वासच बसत नाहीये..." असं म्हणत त्यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अजिदादा असं लिहित अश्रू अनावर झाल्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. अजित पवार यांच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
अजित पवार यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवला होता. काका शदर पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आलेल्या अजित पवार यांनी सहकार क्षेत्रातून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली. पुढे १९९१ मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र ते खऱ्या अर्थाने रुळले ते महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हे सलग आमदार म्हणून निवडून आले. तसेच अर्थ, नियोजन, जलसंपदा, ऊर्जा अशा प्रमुख मंत्रालयांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद सर्वाधिक काळ सांभाळण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर होता. तसेच सध्या राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते.
Web Summary : Deputy Chief Minister Ajit Pawar tragically died in a plane crash near Baramati. Musician Saleel Kulkarni expressed his shock and grief, sharing an emotional tribute. Pawar's death creates a void in Maharashtra's politics; he served as Deputy CM and held key ministerial portfolios.
Web Summary : उपमुख्यमंत्री अजित पवार का बारामती के पास विमान दुर्घटना में दुखद निधन हो गया। संगीतकार सलील कुलकर्णी ने शोक व्यक्त करते हुए भावुक श्रद्धांजलि साझा की। पवार की मृत्यु से महाराष्ट्र की राजनीति में एक शून्य पैदा हो गया; उन्होंने उपमुख्यमंत्री के रूप में कार्य किया और प्रमुख मंत्रालय संभाले।