Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदा कर्तव्य आहे ! सिद्धार्थ आणि मितालीनंतर मराठी इंडस्ट्रीमधील 'ही' प्रसिद्ध जोडी अडकणार विवाह बंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 11:14 IST

मराठी सिनेसृष्टीत सध्या सनई चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत.

सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे. सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीसुद्धा याला अपवाद नाहीत. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडलं आहे. त्यामुळेच मराठी सिनेसृष्टीत सध्या सनई चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत. अभिज्ञा भावे, आशुतोष कुलकर्णीनंतर, मानसी नाईक आणि आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्याही लग्नाचे सूर ऐकायला मिळत आहेत.सध्या सिद्धार्थ आणि मिताली दोघांच्याही घरी लगीन घाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सिद्धार्थ आणि मिताली नंतर आस्ताद काळे आणि स्वप्निल पाटील लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. नुकतेच दोघांच्या केळवणाांचे फोटो समोर आले आहेत. मेघा धाडेने त्यांच्या केळवणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

मराठी बिग बॉसमधून अभिनेता आस्ताद काळे याची लव्हस्टोरी जगासमोर आली होती. अभिनेत्री स्वप्नाली पाटीलसोबतच्या रिलेशनशिपची कबुली त्याने बिग बॉस मराठीमध्ये दिली होती. दोघे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

दोघांनी  पुढचे पाऊल या मालिकेत त्याच्यासोबत काम केले होते. ते दोघे अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. अनेक वर्षांपूर्वी  एका मालिकेचा पायलट एपिसोड शूट करण्यात आला होता.

त्या कार्यक्रमात आस्ताद आणि स्वप्नाली दोघे भाऊ-बहीण होते. त्यानंतर जवळजवळ तीन-चार वर्षांनी दोघांनी पुढचे पाऊल या मालिकेत काम केले. या मालिकेत स्वप्नालीची एंट्री झाल्यानंतर या दोघांची मैत्री झाली आणि काहीच महिन्यात आस्ताद स्वप्नालीच्या प्रेमात पडला. 

टॅग्स :अस्ताद काळे