Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदिनाथ कोठारेची 'नवी इनिंग'; 'स्टोरीटेलर्स'ना कोठारे व्हिजनसोबत सहनिर्माते होण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 18:20 IST

सोशल मीडियावर आदिनाथने कोठारने  कोठारे व्हिजनच्या नव्या कंपनीची घोषणा केली आहे.

चोखंदळ, हरहुन्नरी अभिनेता म्हणून आदिनाथ कोठारेने आपली ओळख निर्माण केली आहे.आपला सहज सुंदर अभिनय आणि एकसे बढकर एक सिनेमांमुळे आपली छाप समीक्षकांसह रसिकांवर पाडली आहे.अभिनेता आदिनाथ कोठारेने आपल्या कारकिर्दीत यशाची अनेक शिखर पादाक्रांत केली आहेत. आदिनाथ त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आला आहे. 

सोशल मीडियावर आदिनाथने कोठारने  कोठारे व्हिजनच्या नव्या कंपनीची घोषणा केली आहे. स्टोरीटेलर्स नूक असं या नव्या कंपनीचं नाव आहे. याच सोबत त्याने आपल्या नव्या कंपनीच्या पहिल्या सिनेमाचे पोस्टरदेखील शेअर केलं आहे. स्टोरीटेलर्सची पहिली फिअर फिल्म बेनं आहे..या फिल्मचे लेखक, दिग्दर्शक आणि सहनिर्माते नितीन दीक्षित आहेत. तर आदिनाथ कोठारे याचा निर्माता आहे. तसेच भारतातील कान्ससाठी निवडलेल्या 5 फिल्सपैकी बेनं एक आहे. सेलिब्रेटींसह आदिनाथचे चाहते त्याच्या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा देत आहेत. आदिनाथ सध्या कान्स फिल्म फिस्टवलमध्ये आहे. 

सध्या आदिनाथ त्याच्या चंद्रामुखी सिनेमालाही घेऊन चर्चेत आहे. यात त्याने साकारलेल्या दौलतराव या भूमिकेची चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात अमृता खानविलकरने चंद्राची भूमिका साकारली आहे. तर दौलत रावांच्या पत्नीची भूमिका मृण्मयी देशपांडेने निभावली आहे. 'चंद्रमुखी' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे, तर चिन्मय मांडलेकर यांचे पटकथा-संवाद आहेत. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

टॅग्स :आदिनाथ कोठारे