Join us
Daily Top 2Weekly Top 5

"शाळेत असताना एका मुलीवर क्रश होतं", आदिनाथ कोठारेचा खुलासा, म्हणाला, "मी तिला घराच्या खिडकीतून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 16:55 IST

अभिनयातील करिअर, कॉलेजमधील किस्से अशा अनेक गोष्टींबाबत आदिनाथने 'लोकमत फिल्मी'शी बोलताना भाष्य केलं. या मुलाखतीत त्याने त्याच्या क्रशबद्दलही खुलासा केला.

मराठी सिनेसृष्टीतील लाडका अभिनेता म्हणजे आदिनाथ कोठारे. 'छकुला' या चित्रपटातील बालकलाकाराची भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आदिनाथ अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे. 'चंद्रमुखी', 'झपाटलेला २' अशा चित्रपटांत काम करुन  आदिनाथने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. आदिनाथने नुकतीच 'लोकमत फिल्मी'च्या नो फिल्टर या खास शोमध्ये हजेरी लावली होती. 

अभिनयातील करिअर, कॉलेजमधील किस्से अशा अनेक गोष्टींबाबत आदिनाथने 'लोकमत फिल्मी'शी बोलताना भाष्य केलं. या मुलाखतीत त्याने त्याच्या क्रशबद्दलही खुलासा केला. आदिनाथ म्हणाला, "कॉलेज लाइफमध्ये मला लिझा रे हिच्यावर क्रश होता. तेव्हा आफ्रिन हे गाणं रिलीज झालं होतं. ती कुठे राहते, जॉगिंगला कुठे जाते, हे माझ्या मित्रांनी शोधून काढलं होतं." या मुलाखतीत आदिनाथने शालेय जीवनातील अल्लड प्रेमाबद्दलही भाष्य केलं. 

"मी सोळा वर्षांचा असताना एका मुलीवर क्रश होतं. तेव्हा मी दहावीत होतो. ती मुलगीही दहावीतच होती. तिच्या जायच्या वेळेत मी घराच्या खिडकीत जायचो. जेव्हा ती जायची तेव्हा तिची नजरही नकळत वर जायची. मग मी तिला हाताने हाय असं करायचो. ती पण हॅलो करायची. आणि यात मला जगातील खूप मोठा आनंद मिळायचा," असं पुढे आदिनाथ म्हणाला. 

आदिनाथने मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली आहे. '८३' या चित्रपटात तो झळकला होता. त्यानंतर 'क्रिमिनल जस्टिस', 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेब सीरिजमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. आता तो 'बजाओ' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :आदिनाथ कोठारेमराठी अभिनेतासेलिब्रिटी