महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. अडिच दादांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. अजित पवार अचानक अशा अपघातात आपल्याला सोडून जातील, याची कोणीच कल्पना केली नव्हती. अशातच अभिनेत्री वंदना गुप्तेंनी अजित पवारांविषयी खास आठवण सांगितली आहे. अजित पवारांची कडक शिस्त आणि त्यांच्या कामाचा दांडगा अनुभव यामुळे दिसून येतो.
अजित पवार यांच्यासह फोटो शेअर करुन वंदना गुप्ते लिहितात, ''अजितदादा पवार... महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात वेगवान मंत्री अशी त्यांची ख्याती होती. आणि ह्याची प्रचिती वेळोवेळी आम्ही अनुभवली. बारामतीला नाट्यसंमेलन झालं त्यावेळी त्यांच्या घरी आयोजित केलेल्या भोजन समारंभात अत्यंत जिव्हाळ्यानी आम्हाला आग्रह करून महाराष्ट्राच्या वेगळवेगळ्या चवींचे खाद्यपदार्थ आम्हा नाट्यकर्मींना खाऊ घातले होते. राजकारणात व्यस्त असूनही कलेवर, कलाकारांवर खूप प्रेम केलं.''
''साधारण दोन महिन्यांपूर्वी “माणिक वर्मा जन्मशताब्दी” च्या एका कार्यक्रमासाठी फंड मागण्यासाठी मी आणि शशी व्यास त्यांच्या ऑफिस मध्ये पोचलो. इतका वक्तशीर आणि शिस्तीचा त्यांचा वावर बघून मी चाट पडले. आम्हाला बघितल्याबरोबर लांबून नाव घेऊन नमस्कार करून ताबडतोब “माणिकबाईंसाठी हे करणं आमचं कर्तव्यच आहे“ असं सांगून “तशी लेखी नोंद करा आणि ताबडतोब फंड द्या“ असे आदेश दिले. त्यांच्या जाण्याचं दुःख पचविण्याची ताकद संपूर्ण महाराष्ट्राला मिळो ही प्रार्थना... अजितदादा तुमच्या सारखे तुम्हीच...'', अशी पोस्ट लिहून वंदना गुप्तेंनी आठवण जागवली आहे.
Web Summary : Actress Vandana Gupte shared a heartfelt memory of Ajit Pawar, recalling his promptness and respect for the arts. She mentioned a meeting two months prior where he immediately approved funds for a program, highlighting his dedication and efficiency.
Web Summary : अभिनेत्री वंदना गुप्ते ने अजित पवार की एक हार्दिक स्मृति साझा की, कला के प्रति उनकी तत्परता और सम्मान को याद किया। उन्होंने दो महीने पहले हुई एक बैठक का उल्लेख किया जहाँ उन्होंने तुरंत एक कार्यक्रम के लिए धन स्वीकृत कर दिया, जिससे उनका समर्पण और दक्षता उजागर हुई।