Join us

"एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीसाठी..", प्राजक्ता माळीच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 18:04 IST

अभिनेत्री प्राजक्ता माळीची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali)ने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते आणि ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. बऱ्याचदा सोशल मीडियावरील तिची पोस्ट चर्चेत येत असते. दरम्यान अभिनेत्रीनं इंस्टाग्रामवर एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

प्राजक्ता आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला गेलीय. तिथून तिनं आपले फोटो शेअर केले आहे. हे फोटो शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिले, हे फोटोज् post करण्यासाठी २ category मध्ये विभागले होते..१- दात न दाखवता काढलेले फोटोज्…२- दात दाखवून खळखळून हसताना काढलेले फोटोज्..दुसरी category आज post होतेय. प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी ही भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. तु कुठल्या पण category मधले फोटो पोस्ट कर तु सुंदर च दिसणार, नक्की हेच कारण आहे की एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीसाठी तुम्ही मॉडेलिंग वगैरे केलं आहे...आणि हे तेच फोटोज् आहेत?दातकली एक ख्वाबमें आई..दात दाकवून काढलेले फोटो छान आहेत अशी वेगवेगळ्या कमेंट्स तिच्या या फोटोवर चाहत्यांनी केल्या आहेत. 

वर्कफ्रंटसध्या प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते आहे. कार्यक्रमाचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला काही दिवसांपूर्वी भेटीला आला आहे. या कार्यक्रमातून ब्रेक घेऊन प्राजक्ताने थेट लंडन गाठले आहे. ती मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली आहे. तिच्यासोबत अलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे, वैभव तत्ववादी सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. तर अभिनेता ऋषिकेश जोशी सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळीसेलिब्रिटी