Join us
Daily Top 2Weekly Top 5

अतुल परचुरे यांच्या अंत्यदर्शनावेळी अभिनेत्री निवेदिता सराफ यांना अश्रू अनावर, भावुक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 12:23 IST

अतुल परचुरेंच्या अंत्यदर्शनावेळी उपस्थित असलेल्या निवेदिता सराफ, सुचित्रा बांदेकर भावुक झालेल्या दिसल्या. (atul parchure)

अतुल परचुरे यांचं काल वयाच्या ५७ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं. अतुल परचुरे यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. मराठी ते बॉलिवूडपासून अनेक कलाकारांनी अतुल परचुरेंना श्रद्धांजली वाहिली. अतुल परचुरेंचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. लाडका मित्र आणि सच्चा कलाकार गमावल्याची भावना यावेळी प्रत्येकाच्या मनात आहे. अशातच अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा भावुक व्हिडीओ समोर आलाय. 

निवेदिता सराफ यांना अश्रू अनावर

अतुल परचुरेंचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यावेळी उपस्थित होत्या. या दुःखद प्रसंगी अतुल परचुरेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या निवेदिता यांना अश्रू अनावर झालेले दिसले. सुचित्रा बांदेकरही भावुक झालेल्या दिसल्या. अतुल परचुरेंनी त्यांच्या मित्र-मैत्रिणींवर किती प्रेम केले,  सर्वांना किती जीवापाड जपलं याचा अनुभव यावेळी पाहायला मिळाला. लाडका मित्र गमावल्याने अंत्यदर्शनासाठी उपस्थित सर्वच जण भावुक झालेले दिसले.

अतुल परचुरेंच्या निधनाने शोककळा

मराठी तसेच हिंदी मनोरंजनविश्वात नाव गाजवलेले हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचं काल ५७ व्या वर्षी निधन झालं. नाटक, मालिका, सिनेमे अशा सर्वच माध्यमात अतुल परचुरेंनी विविधांगी भूमिका साकारल्या. बालकलाकार म्हणून अभिनयातील कारकीर्दीला सुरुवात केलेल्या परचुरेंनी पुढे  अनेक मालिका, सिनेमे ते थेट कपिल शर्माशोपर्यंत उत्कृष्ट भूमिका साकारुन चाहत्यांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. अतुल परचुरेंच्या निधनाने मनोरंजन विश्वातील एक तारा निखळल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे.

टॅग्स :अतुल परचुरेनिवेदिता सराफ