Krutika Deo: कृतिका देव ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय नायिका आहे.चित्रपट, वेब सीरिज अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप तिने प्रेक्षकांच्या मनावर उमटवली. सध्या कृतिका स्टार प्रवाह वाहिनीवरील लंपडाव या मालिकेत मुख्य भूमिका साकारते आहे. कृतिकाने तिच्या या अभिनय कारकिर्दीत हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलंय.याशिवाय माधुरी दीक्षित आणि रणवीर कपूरयांच्यासोबत देखील काम केलं आहे.
कृतिका देवने 'बकेट लिस्ट' या सिनेमात माधुरी दीक्षितसोबत स्क्रिन शेअर केली. कृतिकाने सिनेमात रिया नावाचं पात्र साकारलं होतं. तर या चित्रपटातून धकधक गर्लने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.शिवाय अभिनेता रणवीर कपूरने देखील बकेट लिस्टमध्ये खास कॅमिओ केला होता. यावेळी रणवीरसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, याविषयी कृतिकाने एका मुलाखतीत सांगितलं. कृतिका ही रणवीरची मोठी चाहती आहे. त्याच्यासोबत काम करणं ही तिच्यासाठी फॅन मोमेन्ट होती.
'दुरदर्शन सह्याद्री'ला दिलेल्या मुलाखतीत कृतिका म्हणाली," मी अकरावीत असल्यापासून तो मला खूप आवडतो. तो माझा आवडता अभिनेता आहे. बकेट लिस्टमध्ये त्याचा एक कॅमिओ होता. तेव्हा आमच्या लग्नाचे किस्से सेटवर सगळ्यांनाच कळले होते. त्यामुळे अभिषेक देखील सगळ्यांच्या ओळखीचा झाला होता. मग जे आमचे दिग्दर्शक होते तेजस देवस्कर यांनी अभिषेक सांगितलं की, अरे तू पण ये... रणवीर येणार आहे. तुमची भेट होईल. तर तो नाही म्हणाला. असं दुसऱ्याच्या सेटवर जायला वगैरे नको. पण, ते म्हणाले तू येऊ शकतो काही हरकत नाही."
त्यानंतर मग कृतिका म्हणाली," मग रणवीर कपूर सेटवर जेव्हा आला तेव्हा मला ते कुतुहल होतंच की तो कसा असेल. तो सेटवर कसा वावरत असेल. हे सगळं मी बघत होते. त्यादरम्यान,माधुरी दीक्षित तिथे होत्या. तेव्हा माधुरी दीक्षित त्याला म्हणाल्या, तुला माहिती आहे का हिचं लग्न झालं आहे. त्यावर तो म्हणाला, नाही... तू मस्करी करते आहेस. मग मी त्याला सांगितलं, माझं खरंच लग्न झालं आहे. तेव्हा रणवीर म्हणाला, कुठे आहे तुझा नवरा? त्याला बोलव. नंतर मग आम्ही फोटो काढत होतो सुद्धा तो स्वत:हून म्हणाला तुझ्या नवऱ्याला पण फोटोसाठी बोलवं. त्यामुळे ही एक छान आठवण आहे." असा सुंदर किस्सा कृतिकाने शेअर केला.
Web Summary : Krutika Deo recalls working with Ranbir Kapoor on 'Bucket List,' revealing his down-to-earth nature. He was curious about her marriage and insisted on including her husband in photos.
Web Summary : कृतिका देव ने 'बकेट लिस्ट' में रणबीर कपूर के साथ काम करने का अनुभव साझा किया। उन्होंने बताया कि रणबीर बहुत ही विनम्र थे और उनकी शादी के बारे में जानने के लिए उत्सुक थे। उन्होंने कृतिका के पति को भी फोटो में शामिल करने का आग्रह किया।