Join us
Daily Top 2Weekly Top 5

कलाकारांचे पैसे थकवणाऱ्यांवर भडकली हेमांगी कवी म्हणाली.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 14:15 IST

कोरोना महामारीमुळे कलाकारांना मानधनात करावी लागली कपात, या महामारीमुळे अतिशय वाईट परिणाम झाले आहेत.

कोरोनामुळे प्रत्येक इंडस्ट्रीचे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे, तर बर्‍याच लोकांच्या वेतनात कपात करण्यात आली आहे. टीव्ही इंडस्ट्रीलाही कोरोनाचा फटका बसला आहे. येथे देखील टीव्ही स्टार्सना आता पे-कटचा सामना करावा लागत आहे. त्यात अजून  90 दिवसांचे क्रेडीचे भूत अजूनही कलाकारांच्या मानगुटीवर असल्याचे सांगत  हेमांगी कवीने संताप व्यक्त केला आहे. कोरोना महामारीमुळे अतिशय वाईट परिणाम झाले आहेत.

लॉकडाऊनमुळे शूटिंग थांबवण्यात आले होते, पण आता अनलॉक झाल्यावर पुन्हा मालिकेचे शुटिंग सुरू झाले आहे. पण  कोरोनामुळे, परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नाही. शासनाच्या नियम अटीनुसार मालिकांच्या शूटिंगला सुरूवात तर झाली पण कलाकारांना मिळणा-या मानधनाबाबतचा प्रश्न अजुनही अनुत्तरीतच आहे. कलाकारांना मानधनाबाबत तिने परखट टीका करत आपले मत स्पष्ट केले आहे.

तिने म्हटले की, आधीच 100 दिवस काम नाही त्याचे पैसे नाही आणि आता काम सुरू होऊन त्यात ही 100 दिवसांची भर! 365 पैकी 200 दिवस पैसे  अकाऊंटला  जमा होणार नाहीत...कर्ज घेतलेल्या बँकेत कसं पाऊल ठेवावं कळत नाहीये! इन्शरन्स पॉलिसेचे हप्ते  कसे भरायचे? घरात दोघे ही याच क्षेत्रात काम करत असतील त्यांचं काय? उरलेल्या 165 दिवसांमध्ये या पैशांसाठी सतत फोन  करायचा, मेसेज करायचे... आज ...उद्या... या आठवड्यात करत करत अजून किती दिवस जाणार माहीत नाही! कलाकार आणि टेक्निकल टीमकडून पूर्ण सपोर्टची अपेक्षा !

पण मानधनाच्याबाबतीत आम्ही अजिबात अपेक्षा करायची नाही! आता तर कलाकाराने स्वतःमेकअप, हेअर, कॉस्चुम करायचे, स्वतःच स्पॉट दादा व्हायचं! आणि मुख्य म्हणजे वेळेत ७ च्या शिफ्टला, महिला कलाकारांना तर ४.३० वाजता उठून ६.३० च्या कॉल टाईमला हजर रहायचं... पण मिळणाऱ्या मानधनाच टाईमींग ? ते आधी ही गंडलेलं होतं आता ही तसच गंडणार आहे! हे कोण मॉनिटर करणार?  कॉन्ट्रॅक्टमध्ये तसं लिहूनच येतंय... म्हणजे ज्याला काम करायचंय तो करेल... ज्याला हे पटत नसेल त्याने अजून 100 काय 365 दिवस घरात बसून काढेल !  काहीच कसं वाटत नाही यार हे कॉन्ट्रॅक्ट बनवताना ! निदान काही महिने तरी 30 दिवसाचं क्रेडीट ठेवावं!

टॅग्स :हेमांगी कवीकोरोना वायरस बातम्या