Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आपल्याला जास्ती काय कळत नाय, पण येक कळतं…'; अभिनेत्री हेमांगी कवी नेमकं काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 14:33 IST

अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

आपल्या रोखठोक आणि मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. विषय कोणताही असो, हेमांगीचं मतं मात्र स्पष्ट असतात.  हेमांगी कवी तिच्या अभिनयाप्रमाणेच सोशल मीडियावरही विशेष सक्रिय आहे. इन्स्टाग्राम तसंच फेसबुकवर अभिनेत्रीच्या पोस्ट चर्चेत येतात. अशातच हेमांगी तिच्या नव्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.

 हेमांगीनं इन्स्टाग्रामवर एक नवा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हेमांगी नेहमीप्रमाणे अगदी सुंदर दिसत आहे. हेमांगीच्या हातात कर्म नाव असलेली एक खास अंगठी पाहायला मिळत आहे. या फोटोला दिलेल्या तिच्या कॅप्शननं सर्वांच लक्ष वेधलं. तिचं हे भन्नाट कॅप्शन चर्चेचा विषय ठरत आहे. तिनं लिहलं, 'आपल्याला जास्ती काय कळत नाय, पण येक कळतं…मानसाचं कर्म चांगलं असलं की नाय त्याला रात्रीची झोप लय भारी लागती अन् झोप समद्या.. समद्या मंजी समद्या सुखांचं मुळ हाय! ज्याला चांगली झोप, तो लय मोट्टा तोप! जय हिंद, जय महाराष्ट्र". 

 हेमांगीचा नवा फोटो आणि कॅप्शन सध्या सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. अनेक लाईक्सचाही वर्षाव होत आहे. तिच्या या फोटोवर एका युजरने लिहलं, 'खूपचं छान दिसत आहे आणि नथ तर भारी दिसत आहे तुला'. तर आणखी एकाने म्हटलं, 'देवाचा तुझ्यावर कायम आशिर्वाद राहो, अशीच खरी रहा ताई'. 

हेमांगी सध्या तिच्या कामात व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वीच तिने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जाहिरातीत काम करत असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्याआधी हेमांगी क्रिकेटर युवराज सिंहबरोबरही जाहिरातीत झळकली होती. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'ताली' आणि 'दो गुब्बारे' या वेब सीरिजमध्ये हेमांगी महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसली. तिच्या भूमिकेचं कौतुक झालं. 'जन्मवारी' या नाटकात सध्या ती काम करत आहे.

टॅग्स :हेमांगी कवीमराठी अभिनेतासेलिब्रिटी