Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री ईशा अगरवालचं 'झोलझाल'मधून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण, चित्रपट आला भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 17:59 IST

Zolzaal Fame Eesha Agarwal: ईशा अगरवालने 'झोलझाल' चित्रपटात मंजूची भूमिका साकारली आहे.

हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्री गाजवल्यानंतर अभिनेत्री ईशा अगरवाल ( Eesha Agarwal) हिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. ती झोलझाल (Zolzaal) चित्रपटात झळकली आहे. हा धमाल विनोदी चित्रपट असून नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विशेष बाब म्हणजे २२ विनोदी कलाकार दिसणार आहेत. ईशा अगरवालने या चित्रपटात मंजूची भूमिका साकारली आहे. 

लातूरमधील खेडेगावात जन्मलेल्या ईशा अगरवाल हिने कोणत्याही गॉडफादरशिवाय अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिने कही है मेरा प्यार या हिंदी चित्रपटात तसेच थितिवासल या तमीळ आणि नीवे या तेलगू चित्रपटातही काम केले आहे. ईशा फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे. तसेच ती सोशल मीडिया इनफ्लुएन्सरही असून सौंदर्य, आरोग्य, फिटनेस आणि लाइफस्टाईल क्षेत्रातील काही प्रतिष्ठित ब्रॅण्डससाठी काम करते आहे. तिचा दुसरा चित्रपट दिवाळीत रिलीज होणार आहे. यात ती शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तिला आव्हानात्मक तसेच दमदार भूमिका करायची आहे. तसेच तिला निगेटिव्ह भूमिकाही साकारायला आवडेल, असे ईशा अगरवाल सांगते. 

अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत 'रोलींगडाईस' असोसिएशन सोबत 'युक्ती इंटरनॅशनल प्रोडक्शन' अंर्तगत 'झोलझाल' चित्रपट भेटीला आला आहे. दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून निर्मित निर्माता गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता, संजना जी अग्रवाल यांनी केली असून सहनिर्माते म्हणून रश्मी अग्रवाल आणि विनय अग्रवाल यांनी बाजू सांभाळली असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता लिखित आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची बाजू प्रफुल-स्वप्नील आणि ललित रामचंद्र यांनी उत्तमरित्या पेलली आहे. या चित्रपटात मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, प्रीतम कागणे, ईशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक हे कलाकार दिसणार आहेत.

टॅग्स :कुशल बद्रिकेभारत गणेशपुरे