विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला 'छावा' (chhaava movie) सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. विकी कौशल (vicky kaushal) सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतोय. याशिवाय सिनेमात महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना (rashmika mandanna) दिसत आहे. सिनेमात औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना (akshay khanna) दिसणार आहे. या सिनेमात अनेक मराठी कलाकारही पाहायला मिळणार आहेत. यापैकी एक म्हणजे अभिनेता सुव्रत जोशी. (suvrat joshi) सुव्रतने लोकमत फिल्मीशी संवाद साधताना 'छावा'च्या शूटिंगवेळी आलेला अविस्मरणीय क्षण सांगितला आहे.
सुव्रत जोशीने सांगितला अविस्मरणीय क्षण
सुव्रत जोशीने छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा संगमेश्वरला कैद होते, तो सीन सिनेमात शूट करताना आलेला अनुभव शेअर केलाय. सुव्रतने सांगितलं की, "शेवटच्या युद्धाच्या वेळी सगळे ज्युनियर कलाकार होते. मला असं वाटलं की, ज्या मेहनतीने हे सर्व लोक काम करत होते त्याला तोड नाही. एकदा मी असा जस्ट उभा राहिलेलो तेव्हा डावीकडून उजवीकडे नजर फिरवली, तर जवळपास १०० -१५० ज्यूनियर्स आणि इतर लोक मिळून तब्बल २५०-३०० लोक उन्हातान्हाची पर्वा न करता शूटिंग करत होते. सगळे तिथे प्रचंड मेहनत करुन काम करत होते."
"दुपारी मी सर्व हे पाहिलं आणि मला वाटलं की, काहीतरी वेगळ्या गोष्टीने हे लोक भारावलेत. नुसतं काम आहे आणि आपल्याला पैसे मिळत आहेत म्हणून कोणी काम करत नव्हतं. हे पॅशन आपल्याला प्रायोगिक थिएटर करताना किंवा नाटक करताना जाणवतं. तसं मला त्या दिवशी काही क्षणांसाठी वाटलं." अशाप्रकारे सुव्रतने 'छावा'च्या सेटवर अनुभवलेला अविस्मरणीय क्षण सांगितला. सुव्रत 'छावा'मध्ये एका खास भूमिकेत दिसणार आहे. १४ फेब्रुवारी २०२५ ला 'छावा' सिनेमा जगभरात रिलीज होतोय.