Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ved Marathi Movie : वेड सिनेमा मराठीत करण्याचा निर्णय का घेतलास? रितेश म्हणाला- माझ्या रक्तात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 15:54 IST

रितेश देशमुखनं लोकमतला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केले का की त्याने वेड सिनेमा मराठीत करण्याचा निर्णय का घेतला.

Ved Marathi Movie : सध्या रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख या जोडीने सर्वांना वेड लावले आहे. ‘वेड’ या मराठी चित्रपटातून दोघेही चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. यातून रितेश पहिल्यादांच दिग्दर्शनात पाऊल ठेवत आहे आणि पहिलाच चित्रपट त्याने मराठीत काढला आहे. चित्रपट, त्यातील गाणी सगळ्याच गोष्टींचे कौतुक होताना दिसतेय.  वेडच्या निमित्ताने रितेश आणि जिनिलियानं लोकमतच्या टीमशी खास बातचित केली. 

वेड हा सिनेमा रितेशनं हिंदीत पण करु शकत होता पण वेडची गोष्ट तुला मराठीतून सांगावी असं वाटलं यावर उत्तर देताना रितेश म्हणाला, माणून जरा गाढ झोपतं असेल आणि त्याला जरा मध्येच दचकून कुणी हाक मारली तर तो मातृभाषेतच पहिल्यांदा ओरडतो. मी शिकलो इंग्रजीत हिंदी मला चांगली बोलता येते. मी गेली २० वर्ष हिंदी चित्रपटात काम केलंय परंतू मराठी भाषेची जा आपुलकी आहे, जी ओढ आहे ती रक्तातचं आहे. मला आठवतंय पप्पा म्हणाले होते की हिंदीत तर काम करतोस मराठीत काय करणार आहेस?, तोपर्यंत मी विचारचं नव्हता केला कारण हिंदीत सगळं चागंल चाललं होतं.  मग मी माझी मुंबई फिल्म कंपनी सुरु केली. 

बालक पालक, यलो या दोनही सिनेमात मी काम नव्हतं केलं मी प्रोड्यूस केलं. लयभारीत मी काम केलं, फास्टर फेणेमध्ये मी काम नव्हतं केलं.नंतर माऊली केला आणि हा सहावा सिनेमा. आणि हे सगळं सिनेमा आले तेव्हा पप्पा नव्हते म्हणून मराठी चित्रपटांमध्ये माझं जे नाव येतं ते रितेश विलासराव देशमुख. मला नेहमी असं वाटतं की ते जरी नसले तरी ते माझ्यासोबत असावेत आणि ती ओळख नेहमीसाठी आहेच. म्हणून मला वाटते की मराठी चित्रपट मला करायचा होता आणि आपलं पणा आहे लोकांनी प्रचंड प्रेम पप्पांवर केलं अभिनेता म्हणून माझ्यावर केलं. त्यामुळे हा चित्रपट मराठी करायचं माझ्या डोक्यात होतं असं रितेशनं लोकमतशी बोलताना सांगितलं.   

टॅग्स :वेड चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजा