लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाने खळखळून हसवलं. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्व लक्ष्मीकांत यांनी दणाणून सोडलं. आज जरी 'लक्ष्या' आपल्यात नसले तरीही त्यांच्या भूमिकांच्या माध्यमातून ते आपल्या सर्वांच्या मनात जिवंत आहेत. लक्ष्मीकांत यांना अनेक कलाकार गुरुस्थानी मानतात. अशातच एका मराठी अभिनेत्याने लक्ष्मीकांत यांचा फोटो चक्क देव्हाऱ्यात ठेवलाय. हा अभिनेता म्हणजे प्रियदर्शन जाधव.प्रियदर्शनने देव्हाऱ्याचा फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, ''१९८३ साली शांतेचं कार्ट चालू आहे हे नाटक रंगभूमीवर आलं आणि अक्षरशः धुमाकूळ घातला या नाटकाने. लक्ष्मीकांत बेर्डे सुधीर जोशी नयनतारा लाली जोग यांनी त्यांच्या भूमिका अजरामर करून ठेवल्या. नाटक तुफान गाजले. श्रीनिवास भणगे लिखित आणि " प्रकाश बुद्धीसागर " दिग्दर्शित हे नाटक सुपरहिट ठरलं. बुद्धीसागर काय कमाल करू शकतात ह्या नाटकाने सिद्ध झालं आणि पुढे त्यांनी अनेक सुपरहिट नाटके दिग्दर्शित केली.''
Web Summary : Actor Priyadarshan Jadhav placed Laxmikant Berde's photo in his shrine. Jadhav stars in the play 'Shantecha Cart Chalu Aahe,' revived after a Covid break. He seeks Berde's blessings, hoping audiences will shower the same love. Many praised Priyadarshan's gesture.
Web Summary : अभिनेता प्रियदर्शन जाधव ने लक्ष्मीकांत बेर्डे की तस्वीर अपने देवस्थान में रखी। जाधव 'शांतेचा कार्ट चालू आहे' नाटक में हैं, जो कोविड के बाद फिर से शुरू हुआ है। उन्होंने दर्शकों से वही प्यार मिलने की उम्मीद में बेर्डे का आशीर्वाद मांगा। प्रियदर्शन के इस कदम की कई लोगों ने सराहना की।