Join us

Prasad oak: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रसाद ओकने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाला-

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 14:48 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद ओकने शेअर केलेली पोस्ट व्हायरल होतेय.

 प्रसाद ओक (Prasad oak) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. दर्जेदार अभिनयामुळे ओळखला जाणार प्रसाद सध्या त्याच्या उत्तम दिग्दर्शकीय कौशल्यामुळे चर्चेत येत आहे. दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारा प्रसाद सोशल मीडियावर सक्रिय असतो. गेल्या वर्षी त्याचा धर्मवीर हा सिनेमा चांगलाच चर्चेत आला होता. यात प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली होती. त्याच्या या भूमिकेचं समीक्षकांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सगळ्यांनी कौतुकही केलं आलं होतं. दरम्यान प्रसाद ओकने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्यांपैकी प्रसाद ओक एक आहे. त्याने एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये प्रसादने लिहिले, “मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!!! ईश्वर आपल्याला निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना…!!” अशा शब्दात त्याने शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रसाद ओकने काही दिवसांपूर्वी  'धर्मवीर' या गाजलेल्या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. ‘धर्मवीर 2’ या चित्रपटातही प्रसाद ओकच्या अभिनय कौशल्याची जादू प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद तसेच दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे आहे. आता चाहत्यांना दुसऱ्या भागात काय पहायला मिळतंय याची उत्सुकता लागली आहे. 

टॅग्स :प्रसाद ओक एकनाथ शिंदे