Join us
Daily Top 2Weekly Top 5

Pravin Tarde: 'गरम पाणी पीत रहा, स्वत:ची काळजी घ्या..',प्रविण तरडेची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 18:39 IST

प्रविण तरडेचे अकाउंट हॅक झाल्याची चिंता देखील चाहत्यांना सतावू लागली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रयोगशील दिग्दर्शक आणि उत्तम अभिनेता म्हणजे प्रवीण तरडे (Pravin Tarde). देऊळ बंद, सरसेनापती हंबीरराव, मुळशी पॅटर्न अशा दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन करून प्रवीण तरडे यांनी रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

 प्रविण तरडेने अलिकडेच 'कोरोना' महामारी विषयी पोस्ट केली आहे. स्थिती सुधारल्यानंतर जवळपास वर्षभराने त्यांनी कोरोनाविषयी पोस्ट का केली असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अनेकांनी कमेंट करत याबद्दल विचारलं आहे. ही पोस्ट वाचून प्रविण तरडेचे अकाउंट हॅक झाल्याची चिंता देखील चाहत्यांना सतावू लागली आहे.

''गरम पाणी , चहा , काॅफी पीत रहा आणि एकटं राहून स्वत:ची काळजी घ्या ... हा कोरोना थोडा खतरनाक आहे दोस्तांनो..'' तसेच त्यांनी त्याचा चहाचा कप असलेला एक फोटो देखील शेअर केला आहे. त्यांनी आता कोरोनाविषयी पोस्ट का केली आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

काही दिवस मागे गेले सर तुम्ही कामाच्या व्यापात..... थोड एक दोन वर्ष पुढे या... सरसेनापती सुद्धा प्रदर्शित झालेला आहे, ही पोस्ट तुम्हीच केलीय ही हॅकर ने.. कारण तुमच अकाउंट हॅक झालय अशी बातमी ऐकण्यात आलीय, चहा चांगला नाही झाला का? अशा कमेंट्स त्यांच्या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत. 

टॅग्स :प्रवीण तरडेसेलिब्रिटी