Join us

लक्ष्मीकांत बेर्डेंना १९९७ सालापासून हा अभिनेता करतोय कॉपी, आता आहे मराठीतील स्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 06:00 IST

मराठी सिनेसृष्टीतील हा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांना १९९७ सालापासून फॉलो करतोय.

रसिकांना त्याने खळखळून हसवले ,रसिकांना सारे दु:ख विसरायला लावले आणि मनमुराद मनोरंजन केले. मराठी असो किंवा हिंदी सिनेमा,त्याच्या कॉमेडीच्या भन्नाट आणि अचूक टायमिंगने रसिकांना अक्षरश: वेड लावले. केवळ कॉमेडीच नाही तर प्रत्येक भूमिकेला जीव ओतून न्याय देणारा अभिनेता म्हणजे सा-यांचा लाडका ‘लक्ष्या’ अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे .लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सिनेमाच्या या रंगीत दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर मराठी सिनेमाच नाहीतर नाटक आणि हिंदी सिनेमातूनही स्वत:चा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या. या अभिनेत्याला मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आदर्श मानतात. पण, त्यांचा स्वतःचा मुलगा अभिनयदेखील त्यांना आदर्श मानत असून तो १९९७ सालापासून त्यांना फॉलो करत असल्याचं त्याने सोशल मीडियावर सांगितलं आहे.

अभिनय बेर्डे याने इंस्टाग्राम अकांउटवर त्याच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत तो व लक्ष्मीकांत बेर्डे दिसत आहेत. हा फोटो शेअर करून त्यानं म्हटलं की, १९९७ सालापासून त्यांच्यासारखे हावभाव मॅच करण्याचा प्रयत्न करतोय.

अभिनयनेदेखील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पावलावर पाऊल ठेवत मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली आहे. ती सध्या काय करते या मराठी चित्रपटातून पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकला. या चित्रपटातील त्याचे अभिनयाचे खूप कौतूक झाले.

त्यानंतर तो अशी ही आशिकी चित्रपटात झळकला आणि नुकताच त्याचा रवी जाधव दिग्दर्शित रंपाट चित्रपट प्रदर्शित झाला.

 

या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी त्याच्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटालादेखील प्रेक्षकांनी दाद दिली.  

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेअभिनय बेर्डे