Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आतुर' सिनेमाचा टीझर रिलीज, मूल हवं म्हणून धडपडणाऱ्या महिलेची कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 15:28 IST

राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटण यांच्या आगामी 'आतुर' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.

सध्या मराठीत वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनत आहेत. अनेक प्रयोग होत आहेत. डार्क कॉमेडी, महिलांवर आधारित चित्रपट, गंभीर, हॉरर असे सर्वच विषय येत आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटण यांच्या आगामी 'आतुर' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून मूल हवं म्हणून धडपडणाऱ्या महिलेची कथा यातून मांडण्यात आली आहे. 

'आतुर' या सिनेमा अभिनेत्री प्रिती मल्लापुरकरने भूमिका साकारली आहे. टीझरमधून लक्षात येतं की, सिनेमाची कथा तिच्याच आयुष्याभोवती फिरते. सामान्य गृहिणी असणारी महिला जिला आई होण्याची इच्छा आहे पण तिला मूल होत नाहीए. यात तिचे पती आणि डॉक्टर तिला कसं सावरुन घेत असतात हे यामध्ये दाखवण्यात आलंय. सध्या केवळ टीझर आला असून ट्रेलरमध्ये गोष्ट आणखी जास्त स्पष्ट होईल. 

भावूक विषयावर सिनेमा आधारित आहे त्यामुळे अभिनयाची कसोटीच आहे. प्रिती मल्लापुरकरने यामध्ये ती महिला साकारली आहे. तर योगेश सोमण, चिन्मय उदगीरकर डॉक्टरच्या भूमिकेत आहेत.शिवाजी लोटन पाटील यांची शैली, विषय हाताळण्याची पद्धत आणि प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत गुंतवून ठेवणारं ताकदीचं सादरीकरण या गोष्टींमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारी कलाकृती ही अपेक्षांची पूरेपूर पूर्तता करणारी असेल याबाबत सगळ्यांनाच खात्री असेल!

टॅग्स :चिन्मय उद्गगिरकरमराठी चित्रपटमराठी अभिनेता