अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे. आणि ही जोडी 'आरपार' या सिनेमानिमित्ताने पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. ललित व ऋता 'आरपार' या सिनेमातून पहिल्यांदाच रुपेरी पडदा गाजवणार आहेत. रोमँटिक कथा असलेल्या या सिनेमात ललित व ऋता यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. ‘प्रेमात अधलं मधलं काही नसतं', याचे वर्णन दर्शविणारा हा सिनेमा आहे. 'आरपार' सिनेमाचा ट्रेलर नुकतंच चाहत्यांच्या भेटीला आला आहे.
'आरपार' सिनेमाचा ट्रेलर
'आरपार' सिनेमाचा ट्रेलरमध्ये सुरुवातीला दिसतं की हृता आणि ललित एका कॅफेमध्ये बसलेले असतात. हृतामुळे ललित खूप दुखावलेला असतो. त्याच्या डोळ्यात पाणी आणि बोलण्यात उत्कटता दिसते. अशातच ट्रेलर फ्लॅशबॅकमध्ये जातो. ललित-हृताचं प्रेम कसं जुळतं, हे पाहायला मिळतं. दोघांच्या प्रेमात काहीतरी अडचण येते आणि दोघेही एकमेकांपासून दुरावतात. त्यामुळे ललित भयंकर दुखावला जातो. या दोघांमध्ये नक्की काय झालं असतं हे 'आरपार' सिनेमा जेव्हा रिलीज होईल, तेव्हाच कळेल. ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांंचं चांगलं प्रेम मिळालंय.
ललित प्रभाकर व हृता दुर्गुळे या दोघांच्याही वाढदिवसादिनी म्हणजे १२ सप्टेंबर रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ललित व हृता यांचा वाढदिवस १२ सप्टेंबरला असतो आणि याच दिवशी त्यांचा हा पहिल्यांदाच एकत्रित काम केलेला 'आरपार' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दोन्ही कलाकारांसाठी ही अगदीच आनंदाची बाब आहे. 'लिऑन्स मीडिया प्रॉडक्शन एलएलपी' प्रस्तुत, निर्माते नामदेव काटकर, रितेश चौधरी निर्मित 'आरपार' हा सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद या धुरा गौरव पत्की यांनी सांभाळल्या आहेत. प्रेमाची अनोखी परिभाषा मांडणारा हा रोमँटिक सिनेमा हृता व ललित या नव्या जोडीसह १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.