Join us

'८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी: आता प्रेक्षक करणार 'एन्जॉय'; सिनेमातलं ठेका धरायला लावणारं गाणं रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 13:14 IST

8 don 75 dakta iccha shakti hai: नुकतंच या सिनेमातलं गाणं रिलीज झालं असून हे गाणं उडत्या चालीचं आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाविश्वात '८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी' या सिनेमाची चर्चा सुरु आहे. अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि शुभंकर तावडे यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा येत्या 19 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्येच या सिनेमातील एख जबरदस्त गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

 नुकतंच या सिनेमातलं 'एन्जॉय एन्जॉय' हे उडत्या चालीचं गाणं प्रदर्शित झालं आहे.  या गाण्यात शुभंकर तावडे झळकला असून त्याच्यासोबत प्रियांका जाधवने स्क्रीन शेअर केली आहे. गणेश निगडे यांनी लिहिलेल्या या गाण्याला सुहित अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर आदर्श शिंदे आणि सुहित अभ्यंकर यांनी हे गाणं गायलं आहे. प्रत्येकाला ठेका धरायला लावणारं हे गाणं आहे. त्यामुळे नव्या वर्षाचं स्वागत करताना एन्जॉय एन्जॉय तर व्हायलाच हवं.

दरम्यान,  या सिनेमामध्ये शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री अशी तगडी स्टारकास्ट झळकली आहे. हा सिनेमा नव्या वर्षात म्हणजेच १९ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :सिनेमामराठी अभिनेतासंस्कृती बालगुडेसेलिब्रिटीसंजय मोने