Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमोल कोल्हेंच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण; त्यांच्या पत्नीला पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 18:24 IST

अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांची सोशल मीडियावरील पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांची सोशल मीडियावरील पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पत्नी अश्विनी कोल्हे यांच्यासोबतचे फोटो शेअर करून पत्नीला लग्नाच्या १४व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अमोल कोल्हे यांच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने त्याने पत्नीसाठी स्पेशल पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, १४ वर्षांच्या वनवासाचे फलित काय असते ते माहित नाही, पण १४ वर्षांच्या सहवासाचे फलित नक्कीच चांगले आहे. माणूस म्हणून समृद्ध होणे, संसाराच्या परिघात व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करणे, परस्परपूरक भूमिका घेणे या प्रत्येक गोष्टीत आणखी सुधारणा होत असताना, दोन पाहुणे मात्र आजवर घराबाहेरच ठेवले आहेत ताटकळत. १) ‘तू चूक’ आणि २) ‘मीच बरोबर’. कारण तेवढे केले की सहवासाबरोबरच विरहाच्याही प्रत्येक क्षणाचा सोहळा होतो. समाधानाच्या उंबरठ्याच्या आत सुख नांदतं यावरचा विश्वास दृढ करणाऱ्या सहचारिणीस लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

एक अभिनेता ते यशस्वी राजकारणी हा प्रवास अमोल कोल्हे यांच्यासाठी सोपा नव्हता. पण त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन आज यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशात त्यांच्या इतकाच त्यांच्या पत्नीचा देखील वाटा आहे. अभिनेते अमोल कोल्हे यांच्या पत्नी अश्विनी या सुद्धा डॉक्टर आहेत. त्यांना आद्या आणि रुद्र ही दोन मुले आहेत. सोशल मीडियावर ते मुलांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. आद्या ही ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत काम करताना दिसली होती. 

टॅग्स :डॉ अमोल कोल्हे