Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आज आम्ही ऐवढी गाणी गातो आणि ते फक्त..." गायिका प्रियांका बर्वेनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 15:16 IST

प्रियांका बर्वे ही महाराष्ट्रातील लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे.

Priyanka Brave : प्रियांका बर्वे ही महाराष्ट्रातील लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे.  आपल्या सुमधूर गायनाने तिने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. प्रियांका बर्वे नेहमीच वेगवेगळी गाणी प्रेक्षकांसमोर घेऊन आली आहे. तसेच प्रियांकाने अनेक मराठी चित्रपटातील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. एक व्हर्सटाइल गायिका अशी ओळख तिने संगीत क्षेत्रात निर्माण केली आहे. पण सध्या ही गायिका एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने आपलं परखड मत मांडलं आहे.

मित्रम्हणे या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत संगीत क्षेत्रातील अज्ञात गोष्टींवर तिनं प्रकाश टाकला. मुलाखतीत ती म्हणाली, " आज ऐवढी गाणी आम्ही गातो, टायटल सॉंग्स, सिरियलची सॉंग्स मनापासून गातो. कधीकधी त्या कामाचे पैसेही मिळत नाहीत . बरीच फिल्म सॉंग्सच्या बाबतीत असं झालंय. मी अपेक्षाही करत नाही, कारण त्याच्यावर माझं चाललेलं नाही. माझे कार्यक्रम आहेत, बरीच कामं आहेत. मला गाणं गायला मिळतंय, माझ्या नावावर गाणं होतंय, या हेतुने मी गाणं गाते."  

त्यानंतर पुढे प्रियांका म्हणते, " आम्ही जे सिरिअल टायटल सॉंग गातो ते फक्त एक दिवसच लागतं.  म्हणजे पुढे ते लागतच नाही. टायटल सॉंग लागण्यापूर्वी  डायरेक्ट सिरीअल चालू होते. टायटल सॉंग्ज लागतच नाहीत. मग असं होतं की मग तुम्ही हे का करताय? मग ते टायटल सॉंग युट्यूबवर टाकतात त्याचं क्रेडिटही दिलं जात नाही. कंपोजर, गीतकारांची नावही दिलेली नसतात. त्यामुळे थोडंस वाईट वाटतं, मग आपण हे का करतो? असं वाटू लागतं" अशी खदखद प्रियांकाने या मुलाखतीत व्यक्त केली. 

प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही अनेक गाणी गायली आहेत. ती एक उत्तम पार्श्वगायिका आहे. 'काळोखाच्या वाटेवरती उजेडा रुसला बाई' या गाण्यासाठी तिला राज्य सरकारकडून पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शिवाय 'आनंदी गोपाळ', 'रमा माधव', 'लॉस्ट अ‍ॅंड फाऊंड' तसेच 'डबल सीट' या चित्रपटांसाठी तिने पार्श्वगायन केलं आहे.

टॅग्स :सिनेमामराठी चित्रपटसेलिब्रिटीटेलिव्हिजन