Join us

कौतुकास्पद! सुकन्या मोनेंच्या लेकीने परदेशात 'या' विषयात मिळवली मास्टर्स डिग्री, शेअर केली खास पोस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 10:49 IST

अभिनेत्री सुकन्या मोने यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लेकीच्या पदवीग्रहण समारंभाचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

Sukanya Mone : 'आभाळमाया', 'जुळून येती रेशीमगाठी', 'वादळवाट', 'कळत नकळत', 'प्रेमासाठी वाट्टेल ते', 'एकापेक्षा एक' अशा कितीतरी मालिका, सिनेमांमध्ये काम करुन सुकन्या  मोने (Sukanya Mone) यांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं. आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. दरम्यान, अभिनयासह सुकन्या मोने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आहे.

सुकन्या मोने यांच्या लेकीने ऑस्ट्रेलियात मास्टर्स डिग्री मिळवली आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर त्यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये लाडक्या लेकीसोबतचे  खास फोटो, व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी लिहिलंय, "जुलिया संजय सुकन्या मोने....Master degree in animal science from University of Queensland Brisbane Australia.... पदवी ग्रहण समारंभाला गेले होते.... त्याची काही स्मरणचित्र... हळूहळू सगळी पाठवत जाईन.... आमच्या आनंदात तुम्हालाही सामील करायला आवडेल."सुकन्या मोनेंनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांसह मराठी कलाविश्वातील कलाकारांनी कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.  मुग्धा गोडबोले, सीमा घोगळे, रसिका वेंगुर्लेकर, स्वानंदी टिकेकर या कलाकारांनी जुलियाचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

दरम्यान, सुकन्या मोने यांची लेक जुलियाने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवलं आहे. आई-वडिलांपेक्षा वेगळ्या क्षेत्रात तिने करियर करायचं ठरवलं आहे.'मास्टर इन अ‍ॅनिमल सायन्स अँड मेजर इन वाइल्डलाइफ बायोलॉजी' या विषयात तिने पदव्युत्तर पदवी ग्रहण केली आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून सुकन्या मोनेंची लेक परदेशात शिक्षण घेत होती. अखेर तिच्या मेहनतीचं फळ तिला मिळालं आहे. 

टॅग्स :सुकन्या कुलकर्णीसेलिब्रिटीसोशल मीडिया