Hemal Ingle: मराठी कलाविश्वात सध्या लगीनसराईला सुरूवात झाली आहे. बरेचसे कलाकार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अशातच एका मराठमोळी अभिनेत्री चर्चेत आली आहे. ही अभिनेत्री म्हणजे हेमल इंगळे (Hemal Ingle). मुळची कोल्हापूरची असलेल्या हेमल इंगळेने 'आस'मधून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. अभिनय बेर्डेसोबत 'अशी ही आशिकी' या चित्रपटात ती झळकली होती. या चित्रपटातून ती घराघरात लोकप्रिय झाली. आता लवकरच हेमल लग्न करणार आहे. अलिकडेच तिने साखरपुडा केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्रीने चाहत्यांनी माहिती दिली.
हेमलने ऑगस्ट महिन्यात साखपुडा करत गोड बातमी दिली होती. शिवाय नुकतेच तिने आपल्या मैत्रीणींसोबत ब्राईड टू बी पार्टी करत त्याचेही फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचे पाहायला मिळाले. आता हेमल इंगळेने बॅचलर पार्टीसाठी थायलंड गाठलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याचे सुंदर फोटो शेअर केलेत. फोटोंमध्ये थायलंडमधील समुद्रकिनाऱ्याची झलक तिने व्हिडीओद्वारे दाखवली आहे.
आपल्या मैत्रीणींसोबत हेमल छान धमाल करताना दिसते आहे. तसेच जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून पार्टीलूक केला आहे. अभिनेत्रीच्या या बॅचलर पार्टीची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा आहे. शिवाय अभिनेत्री हेमल इंगळेच्या लग्नाची उत्सुकता देखील चाहत्यांना लागली आहे.