Join us

नारळाची झाडं, तुळशी वृंदावन अन् अंगण; छाया कदम यांनी दाखवली कोकणातील कौलारू घराची झलक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 11:42 IST

अभिनेत्री छाया कदम यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे.

Chhaya Kadam: मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणून छाया कदम  (Chhaya Kadam) यांना ओळखलं जातं. 'सैराट', 'झुंड', 'न्यूड'  ते 'लापता लेडीज','मडगांव एक्सप्रेस' अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. दरम्यान, अलिकडेच छाया कदम या आपल्या कामातून वेळ काढून त्यांच्या कोकणातील गावी पोहोचल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेल्या कोकणातील सुंदर घराच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

छाया कदम यांनी कोकणातील त्यांच्या गावाच्या घराची संपूर्ण झलक व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांनी दाखवली आहे. सुंदर रस्ते, नारळाच्या बागा तसेच कौलारु घरे असं निसर्गरम्य दृश्ये त्यांनी मोबाईलमध्ये कैद केली आहेत. "गाव…मानसा…झाडा…पेडा…जनावरा आणि मी...", असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अभिनेत्रीच्या गावच्या घरातील सुंदर असं तुळशी वृंदावन प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतं.निसर्गाच्या कुशीत वसलेलं त्यांचं कौलारू घर खूपच खास आहे.

दरम्यान, छाया कदम यांनी शेअर केलेल्या गावच्या व्हिडीओवर "मी धामापुर बागीतलंय, सुंदर आहे","खूप भारी घर आहे..."अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

टॅग्स :सेलिब्रिटीकोकणसोशल मीडिया