Santosh Juvekar: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) हा सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर एक छाप उमटवली आहे. १४ फेब्रुवारीला हा सिनेमा जगभरात प्रदर्शित झाला. त्यानंतर बॉक्स ऑफिसवर 'छावा'चं वादळ पसरलं आहे. दमदार कथा, उत्कट अभिनय आणि प्रभावी संवाद यामुळे हा चित्रपट चर्चेत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आली. सिनेरसिकांची या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. त्याचबरोबर 'छावा'मधील विकी कौशल (Vicky kaushal) आणि रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) उत्कृष्ट भूमिकेबद्दल सगळीकडे चर्चा होत आहे. त्याचबरोबर या चित्रपटात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळते आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही चर्चेत आला आहे. अभिनेत्याने 'छावा' या चित्रपटात रायाजी यांची भूमिका साकारली आहे. अशातच नुकतीच संतोष जुवेकरने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे.
दरम्यान, सिनेविश्वात सध्या 'छावा' या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यानिमित्त चित्रपटातील कलाकार वेगळ्या मुलाखतींमधून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून काही पडद्यामागचे क्षण किंवा काही आठवणी शेअर करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर संतोष जुवेकरने आपल्या इन्स्टाग्रामवर खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलंय की, आठवणीतले "छावा" च्या शूटिंगचे दिवस. रोज कामाला सुरुवात व्हायची ती अशी शिव आणि शंभूराजांच्या गर्जनेने..., जय भवानी, जय शिवराय. जय शंभुराजे...! आणि ही गर्जना फक्त आमचा आर्ट डायरेक्टर बालाच द्यायचा...",अशी माहिती या पोस्टद्वारे अभिनेत्याने चाहत्यांना दिली आहे. त्याने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, संतोषसह 'छावा' या चित्रपटात मराठी कलाकारांची मोठी स्टारकास्ट आहे. नीलकांती पाटेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, शुभंकर एकबोटे, किरण करमरकर, मनोज कोल्हटकर, आशिष पाथोडे असे मराठी कलाकारांच सिनेमात प्रमुख भूमिका आहे.