Join us

"कधीही न विसरता येणारा दिवस...", लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी प्रथमेश परबची पोस्ट, शेअर केले unseen फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 10:21 IST

अभिनेता प्रथमेश परबने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

Prathmesh Parab: मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रथमेश परब (Prathamesh Parab). 'टाईमपास' या चित्रपटामुळे तो घराघरात पोहोचला. या चित्रपटामध्ये त्याने साकारलेली दगडूची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. प्रेक्षकांचा हा लाडका दगडू सध्या चर्चेत आला आहे. दरम्यान, मनोरंजन विश्वात यश मिळाल्यावर प्रथमेश परबने वैयक्तिक आयुष्यात एक नवीन इनिंग सुरु केली. त्याने गेल्यावर्षी २४ फेब्रुवारी २०२४ या दिवशी क्षितीजा घोसाळकरसोबत लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. आज प्रथमेश-क्षितिजाच्या सुखी संसाराला एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्ताने अभिनेत्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केल्याची पाहायला मिळतेय. 

अभिनेता प्रथमेश परब सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो.  नुकतीच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात अभिनेत्याने त्याची पत्नी क्षितीजाबरोबरचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. शिवाय या पोस्टला त्याने हटके कॅप्शनही दिलं आहे. प्रथमेशने या फोटोंना "24.02.2024.., आतुरतेने वाट पाहिलेला आणि कधीही न विसरता येणारा दिवस...", असं कॅप्शन देत त्यांच्या लग्नातील सुंदर असे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. दरम्यान, प्रथमेश आणि क्षितीजा यांच्यावर लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त मनोरंजन विश्वातून तसेच त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

प्रथमेश परबच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच तो 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या सिनेमात झळकला होता. याशिवाय त्याने 'श्री गणेशा', 'टाईमपास', 'डिलिव्हरी बॉय', 'उर्फी','टकाटक', 'बालक पालक',अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :प्रथमेश परबमराठी अभिनेतासेलिब्रिटीसोशल मीडिया