Join us
Daily Top 2Weekly Top 5

"ढाक्कूमाकूम ढाक्कूमाकूम", मराठी कलाकारांचा गोकुळाष्टमीनिमित्त जबरदस्त डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 10:58 IST

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मराठी अभिनेता संकेत कोर्लेकरने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मराठी मालिकेतील काही कलाकार "ढाक्कूमाकूम ढाक्कूमाकूम" या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

संपूर्ण देशभरात गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. श्रीकृष्णाचा जन्मोत्सव, जन्म सोहळा विविध पद्धतीने साजरा केला जातो. यंदा २६ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण दिसत आहे. अनेक मालिकांमध्ये गोकुळाष्टमी साजरी केल्याचं दाखवलं जातं. मराठी कलाकारही मोठ्या उत्साहात गोकुळाष्टमी साजरी करतात. 

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मराठी अभिनेता संकेत कोर्लेकरने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मराठी मालिकेतील काही कलाकार "ढाक्कूमाकूम ढाक्कूमाकूम" या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला दोन वेगळी गाणी लागल्याने कलाकारांचा मूड ऑफ झाल्याचं दिसत आहे. पण, "बोल बजरंग बली की जय" हे गाणं वाजताच कलाकारांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचं दिसत आहे. हे गाणं लागताच सगळे कलाकार डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

संकेतने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. संकेतने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अजूनही बरसात आहे, हम बने तुम बने, लेक माझी दुर्गा, विठु माऊली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची महागाथा या मालिकांमध्ये तो झळकला आहे. संकेत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. त्याचं युट्यूब चॅनेल असून भाऊ-बहिणीचे रील व्हायरलही होत असतात. 

टॅग्स :जन्माष्टमीटिव्ही कलाकारमराठी अभिनेता