बॉलिवूड कलाकारांचं फिटनेस प्रेम जगजाहिर आहे. पण मराठी सेलिब्रिटीही मागे नाहीत. आता मराठी सेलिब्रिटीही वेळात वेळ काढून फिटनेसकडे लक्ष देऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, त्याची चर्चाही होतेय. सध्या मराठीतील एका कपलची जोरदार चर्चा आहे. होय, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री श्वेता मेहेंदळे (Shweta Mehendale)आणि तिचा पती व अभिनेता राहुल मेहेंदळे (Rahul Mehendale) यांचा ‘फॅट टू फिट’ अवताराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
{{#allowed}} {{#config.logo.enabled}}
{{/config.logo.enabled}}
{{/allowed}}
श्वेता व राहुल यांनी जबरदस्त वेट लॉस करत सर्वांनाच थक्क केलं आहे. श्वेताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केलाय. यात तिने नवऱ्यासोबतचा आधीचा आणि नंतरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून चाहते अवाक् झाले आहेत. कपलनं बरंच वजन कमी केल्याचं यात स्पष्ट दिसतंय. 2019 मध्ये या कपलनं वेट लॉस करण्यासं मनावर घेतलं. 2022 मध्ये त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता. अवघ्या दोन वर्षात दोघांचं ट्रान्सफॉर्मेशन थक्क करणारं आहे.
चाहते म्हणाले, जुनेच छान होते...श्वेता व राहुलचं ट्रान्सफॉर्मेशन काही जणांना आवडलंय. पण काहींनी मात्र जुनेच छान दिसायचे, म्हणत काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. ‘तब्येत होती तेव्हाच छान दिसत होते,’ अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. उगाच बारीक झालात तुम्ही, अशी मजेशीर प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. ‘आधीच छान दिसत होतात तुम्ही, आता आजारातून उठून आलात, असं वाटत आहे,’ अशी कमेंट अन्य एका चाहत्याने केली आहे. एका चाहत्याची कमेंट चांगलीच लक्षवेधी आहे. ‘कोणती जडीबुटी खाल्ली सरांनी. एकदम नौजवान झाले राव... ये काली काली आंखे (आधी घारे होते) ये काले काले बाल (आधी गोरे गोरे पान होते) झक्कास, जबरदस्त.. एक नंबर लुक,’ अशा शब्दांत एका युजरने कपलचं कौतुक केलं आहे.
श्वेता सध्या सध्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत काम करत आहे. यापूर्वी ती ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत दिसली होती. यात तिने रेवतीची भूमिका साकारली होती. नायक,या गोजिरवाण्या घरात, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला या मालिकांमध्ये श्वेतानं भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय धूम 2 धमाल,पाच नार एक बेजार,सगळं करुन भागलं, असा मी तसा मी, जावईबापू जिंदाबाद अशा सिनेमांमध्येही श्वेताने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.