Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेजश्री प्रधानचा कौतुकास्पद निर्णय; मृत्यूनंतर करणार नेत्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 11:18 IST

Tejashri pradhan: तिने घेतलेल्या या निर्णयामुळे सध्या सोशल मीडियावर ती कमालीची चर्चेत येत आहे.

'होणार सून मी या घरची', 'अग्गंबाई सासूबाई' अशा कितीतरी गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान (tejashri pradhan). उत्तम अभिनयासह तेजश्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत येत असते. कायम चाहत्यांच्या संपर्कात राहणाऱ्या तेजश्रीने एक मोठा आणि तितकाच कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टनुसार, तेजश्रीने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तेजश्रीच्या पश्चात गरजू व्यक्तीला तिचे डोळे दान करण्यात येणार आहे. तिने घेतलेल्या या निर्णयामुळे सध्या सोशल मीडियावर ती कमालीची चर्चेत येत आहे. तेजश्रीने नुकताच नेत्रदान करण्यासाठीचा फॉर्म भरला आहे. 

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, तेजश्री  सक्षम या सामाजिक संस्थेशी जोडली गेली आहे. या संस्थेअंतर्गत ती नेत्रदान करणार आहे. तेजश्री मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नाटक, मालिकांच्या माध्यमातून तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीला आली असून अल्पावधीत तिने तिचा स्वतंत्र असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. मालिकांसोबतच तेजश्री काही गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्येही झळकली आहे. 

टॅग्स :तेजश्री प्रधान सेलिब्रिटीटेलिव्हिजन