Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी झाली हो! स्मिता तांबेच्या घरी चिमुकलीचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 15:23 IST

Smita tambe : स्मिताने याविषयी सोशल मीडियावर कोणतीही माहिती दिली नसली तरीदेखील तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींकडून ही माहित समोर येत आहे. 

ठळक मुद्देदोन महिन्यांपूर्वीच स्मिताचं डोहाळ जेवण थाटात पार पडलं होतं.

मराठमोळी अभिनेत्री स्मिता तांबे हिच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं आहे. स्मिता काही दिवसांपूर्वीच आई झाली असून तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. स्मिताने याविषयी सोशल मीडियावर कोणतीही माहिती दिली नसली तरीदेखील तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींकडून ही माहित समोर येत आहे. 

काही महिन्यांपूर्वीच मोठ्या थाटामाटात स्मिताच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. विशेष म्हणजे तिच्या डोहाळ जेवणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळे स्मिताप्रमाणेच तिच्या चाहत्यांनादेखील नव्या बाळाच्या आगमनाची ओढ लागली होती.  त्यानंतर आता स्मिताने एका गोड बाळाला जन्म दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे स्मिताचं हे बाळ नेमकं कसं दिसतं हे पाहण्याची उत्सुकता नेटकऱ्यांना लागली आहे.

दरम्यान, हिंदी आणि मराठी कलाविश्वात झळकलेल्या स्मिताने २०१९ मध्ये विरेंद्र द्विवेदीसह लग्नगाठ बांधली. स्मिता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने 'जोगवा', '७२मैल - एक प्रवास', 'परतु', 'देऊळ' यासह विविध मराठी सिनेमात तसंच 'सिंघम रिटर्न्स', 'रुख' बॉलिवूड चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

टॅग्स :स्मिता तांबेटिव्ही कलाकारसेलिब्रिटी