Join us

'भलेही आठवडाभर आराम केलेला असो, पण..'; नव्या फोटोसह आर्याची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 16:11 IST

Aarya Ambekar: आर्या अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. मात्र, यावेळी लेझी लूकमधील फोटो शेअर केला आहे.

उत्तम स्वरसाज लाभलेली लोकप्रिय गायिका म्हणजे आर्या आंबेकर (Arya Ambekar). आपल्या सुरेल आवाजाने आणि सौंदर्याने आर्या कायमच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. आर्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून वरचेवर नवनवीन पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. यात अलिकडेच तिने एक नवी पोस्ट शेअर केली असून नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

आर्या अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. मात्र, यावेळी लेझी लूकमधील फोटो शेअर केला आहे. तसंच विकेंडची मज्जा घेणं हे शास्त्र असतं असंही तिने म्हटलं आहे.

"भलेही आठवडाभर आराम केलेला असो, पण weekend म्हटलं की Officially आराम केलाच पाहिजे. शास्त्र असतं ते", असं कॅप्शन देत आर्याने तिचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती आळसावलेल्या अंदाजात दिसून येत आहे. 

दरम्यान, सारेगमप या कार्यक्रमामुळे घराघरात पोहचलेली आर्या आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आर्याने आतापर्यंत अनेक चित्रपट, मालिकांचे शीर्षक गीत, म्युझिक अल्बमसाठी काम केलं आहे. तसंच ती सध्या काय करते या चित्रपटातही काम केलं आहे. 

टॅग्स :आर्या आंबेकरसेलिब्रिटीसिनेमा