Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅमेऱ्याकडे बघून स्टायलिश अंदाजात पोझ देणारी 'ही' चिमुकली आहे टीव्हीवरील 'संस्कारी बहू', तुम्ही ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 12:43 IST

बालदिनानिमित्त अनेक कलाकारांनी त्यांचे लहानपणीचे फोटो शेअर केले होते. अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

अनेक कलाकारांचे बालपणीचे फोटो व्हायरल होताना दिसतात. आपले आवडते कलाकार लहानपणी कसे दिसायचे? याबाबत चाहत्यांनाही उत्सुकता असते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना आवडतं. नुकताच बालदिन साजरा करण्यात आला. बालदिनानिमित्त अनेक कलाकारांनी त्यांचे लहानपणीचे फोटो शेअर केले होते. अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

बालदिनाचे औचित्य साधून टीव्ही अभिनेत्रीने तिच्या बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये चिमुकलीने साडी नेसून गजराही लावला आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या फोटोत तिचा स्टायलिश अंदाज दिसत आहे. स्टायलिश अंदाजात दिसणारी ही चिमुकली टीव्हीची 'संस्कारी बहू' आहे. ही अभिनेत्री म्हणजे शिवानी रांगोळे. सध्या 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतून शिवानी प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या मालिकेत ती अक्षरा ही भूमिका साकारत आहे. 

शिवानीने अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांतही काम केलं आहे. 'बना मस्का', 'आम्ही दोघी', 'सांग तू आहेस का?' अशा गाजलेल्या मालिकांमध्ये शिवानी महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या सुभेदार चित्रपटात तिने ऐतिहासिक भूमिका साकारली होती. शिवानीने २०२२ मध्ये अभिनेता विराजस कुलकर्णीबरोबर लग्नगाठ बांधली. विराजसदेखील उत्तम अभिनेता आहे. 

टॅग्स :शिवानी रांगोळेटिव्ही कलाकार