Join us

'ही' लोकप्रिय अभिनेत्री चहाची मोठी फॅन! दिवसाला घेते 93 कप चहा, सिद्धार्थ चांदेकरनं केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 16:43 IST

मराठी सिनेसृष्टीत अशी एक अभिनेत्री आहे. जिचं चहावर जिवापाड प्रेम आहे.

 चहा हा जवळपास सर्वांनाच प्यायला आवडतो. चहा प्रेमींची सख्या ही मोठी आहे. सेलिब्रेटी हे नेहमीच डाएट वगैरे करताना दिसतात. मात्र, असे असताना देखील चहा पिण्यापासून ते देखील स्वत: ला रोखू शकत नाहीत. यामध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींचा समावेश होतो. मराठी सिनेसृष्टीत अशी एक अभिनेत्री आहे. जिचं चहावर जिवापाड प्रेम आहे. ऐवढा चहा पिते म्हणून तिने अनेकदा ओरडाही खाल्ला आहे. पण, चहा मात्र सोडला नाही. 

मराठमोळी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही. तर ही सायली संजीव आहे. सायली संजीव हिला चहा प्यायला प्रचंड आवडतो. सायली ही दररोज कायमच चहा पिते. अनेकदा चित्रपटाच्या सेटवरही ही चहा पिताना दिसते. दिवसातून ती एक दोन नाही. तर तब्बल  दिवसाला 93 कप चहा घेते. नुकतेच 106.4 या रेडिओ चॅनलला देलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदकरने सायलीच्या या सवयींबद्दल खुलासा केला.

सिद्धार्थ म्हणाला, 'सायली ही दिवसातून 93 कप चहा पिऊ शकते. सायली ही प्रचंड चहा प्रेमी आहे. ती सतत चहा पित असते. मला कधी कधी तर वाटतं की तिच्या तोंडातून आता बागा बाहेर येतील'. यावर सायलीनेही सहमती दर्शवली. ती म्हणाली, 'मला चहा खूप आवडतो. यावरुन मला अनेकदा लोक ओरडतात, पण दुसऱ्या क्षणाला तेच लोक माझ्यासाठी चहाची ऑर्डर करतात'.

नुकतेच सायली आणि सिद्धार्थ यांचा 'झिम्मा २' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.  या सिनेमातील तिने साकारलेली कृतिका ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'झिम्मा २'मुळे सायलीच्या चाहत्या वर्गातही प्रचंड वाढ झाली आहे. सायली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही सायली पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देत असते.

टॅग्स :सायली संजीवसेलिब्रिटीमराठी अभिनेतामराठी चित्रपटसिद्धार्थ चांदेकर