Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आज बरोबर ६ महिने झाले..';खास व्यक्तीच्या आठवणीत सायली संजीव झाली भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 10:37 IST

Sayali sanjeev: सहा महिन्यांपूर्वी सायली संजीवने तिच्या वडिलांना गमावलं. तिच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याविषयी भाष्य केलं होतं.

'काहे दिया परदेस' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव (sayali sanjeev). एकेकाळी मालिकांमध्ये झळकलेली सायली आज रुपेरी पडद्यावर झळकत आहे. त्यामुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे सायली.  सहा महिन्यांपूर्वी सायली संजीवने तिच्या वडिलांना गमावलं. तिच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याविषयी भाष्य केलं होतं. त्यानंतर आता तिने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे.

वडिलांची साथ कायम सोबत रहावी यासाठी सायलीने त्यांची वापरलेली अंगठी स्वत:च्या मापात करुन घेतली आहे. तसंच या अंगठीवर तिने बाबांचं नावदेखील कोरुन घेतलं आहे. सोबतच या अंगठीचा फोटो पोस्ट करुन वडिलांसाठी खास पोस्टही लिहिली आहे.

"बाबा कायम माझ्यासोबत माझ्याजवळ असावे म्हणून त्यांनी वापरलेल्या अंगठीची मी ही अंगठी माझ्यासाठी करून घेतली. आज बरोबर ६ महिने झाले त्यांना जाऊन.. I love you बाबा..", असं कॅप्शन देत सायलीने या अंगठीचा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान,  सोशल मीडियावर सक्रीय असलेली सायली अनेकदा तिच्या कुटुंबाविषयी व्यक्त होत असते. यात तिच्या बऱ्याचशा पोस्ट वडिलांशी संबंधित असतात. त्यामुळे तिचं आणि तिच्या वडिलांचं बॉण्डिंग किती घट्ट आणि छान होतं याचा अंदाज लावता येतो. यापूर्वीही सायलीने तिच्या वडिलांच्या आठवणीत एक गोधडी तयार करुन घेतली होती. या गोधडीवर तिच्या वडिलांचं नाव विणण्यात आलं होतं. 

टॅग्स :सायली संजीवसेलिब्रिटीटिव्ही कलाकार