Join us

समीरा गुजरच्या चिमुकल्या लेकीला पाहिलंय का? हुबेहुब आहे आईची कार्बन कॉपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 14:50 IST

Samira gujar: गाढवाचं लग्न' या चित्रपटाच राजकन्येची भूमिका साकारणाऱ्या समीरा गुजर यांची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

एकेकाळी उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे प्रेक्षकांना घायाळ करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समीरा गुजर. एक अभिनेत्री असण्यासोबतच त्या उत्तम सूत्रसंचालिकादेखील आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर बऱ्याचदा त्यांची चर्चा रंगत असते. 'गाढवाचं लग्न' या चित्रपटाच राजकन्येची भूमिका साकारणाऱ्या समीरा गुजर यांची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. समीरा त्यांच्या लेकीमुळे चर्चेत आल्या आहेत.

अलिकडेच समीरा यांनी त्यांच्या लेकीसाठी एक छान पोस्ट शेअर केली.  समीरा यांनी त्यांच्या लेकीसोबत एक व्हिडीओ केला होता. हा व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.या व्हिडीओमध्ये त्यांच्या लेकीची झलक पाहिल्यानंतर ती हुबेहूब समीरा यांच्यासारखीच दिसत असल्याचं लक्षात येतं. त्यामुळे सोशल मीडियावर या मायलेकीची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, समीरा अलिकडेच 'आय एम सॉरी' या सिनेमात आणि रानबाजार या वेबसीरिजमध्ये झळकल्या होत्या. या सीरिजमध्ये त्यांनी चारुदत्त मोकाशीच्या बायकोची भूमिका साकारली होती. तसंच सध्या त्या प्रेमास रंग यावे या मालिकेत काम करत आहेत. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन