Join us

Video: 'परमसुंदरी'वर ऋतुजा बागवेने नऊवारी साडीत धरला ठेका; मराठमोळा साजशृंगारात जिंकली नेटकऱ्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 15:19 IST

Rutuja bagwe: अलिकडेच ऋतुजाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने मराठमोळ्या पद्धतीने साजशृंगार केला असून नऊवारी साडी नेसली आहे.

ठळक मुद्देअलिकडेच ऋतुजाने घटस्थापनेनिमित्त इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता.

नाटक आणि टीव्ही मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवलेली अभिनेत्री ऋतुजा बागवे. 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेच्या माध्यमातून ऋतुजा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. या मालिकेत अभिनेता सुबोध भावने तिच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. कलाविश्वामध्ये सक्रीय असलेली ऋतुजा सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. अलिकडेच ऋतुजाने घटस्थापनेनिमित्त इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून तिला पसंती मिळत आहे.

अलिकडेच ऋतुजाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने मराठमोळ्या पद्धतीने साजशृंगार केला असून नऊवारी साडी नेसली आहे. विशेष म्हणजे मराठमोळ्या पद्धतीने तयार झालेल्या ऋतुजाने 'परमसुंदरी'वर इन्स्टा रिल केलं आहे. त्यामुळे सध्या तिच्या या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु आहे.

"आज घटस्थापना.. आज पासुन नवरात्र उत्सव सुरू होत आहे..नटायची,सजायची व उत्सव साजरा करण्याची वेळ आता आली आहे.. मी पारंपारिक मराठी थाटात सजलीये..हाताने विणलेल्या नऊवारी पैठणी साडीचे तेजच वेगळे! नवरात्रीचा पहिला दिवस देवी - शैलपुत्रीचा. आजचा रंग पिवळा..हे निसर्गाची शक्ती, तेज व आनंदाचे प्रतीक आहे. आपण स्त्रीत्व साजरे करत असताना शक्तीचा आदर करूया आणि दुर्गा मातेचे आशीर्वाद घेऊया", असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी 'परमसुंदरी'वर वेगवेगळे व्हिडीओ शूट केले आहेत. मात्र, ऋतुजाने या गाण्याच्या माध्यमातून तिचं मराठमोळेपण जपत सुंदर व्हिडीओ केल्यामुळे तो नेटकऱ्यांना भलताच आवडत आहे.  

टॅग्स :ऋतुजा बागवेसेलिब्रिटीइन्स्टाग्राम