Join us
Daily Top 2Weekly Top 5

सासू पाहिजे तर अशी! निर्मिती सावंतबरोबरचा फोटो शेअर करत रिंकूची पोस्ट, म्हणते, "माझं लग्न झालं नाही पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 12:52 IST

रिंकूने अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्याबरोबरचा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

रिंकू राजगुरू ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'सैराट'मधील आर्ची अनेकांची क्रश आहे. पहिल्याच चित्रपटाने रिंकूला प्रसिद्धीझोतात आणलं. 'सैराट' प्रदर्शित होऊन सात वर्षांनंतरही रिंकूच्या लोकप्रियतेत तसूभरही घट झालेली नाही. उलट दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. रिंकू सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबाबत पोस्ट शेअर करत ती चाहत्यांना माहिती देत असते. 

सध्या रिंकूने केलेल्या अशाच एका पोस्टची चर्चा रंगली आहे. रिंकूने अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्याबरोबरचा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "माझं लग्न झालेल नाही पण,सासू पाहिजेल तर अशी," असं रिंकूने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहे. 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा २' या सिनेमात रिंकू आणि निर्मिती सावंत झळकल्या आहेत. या सिनेमात रिंकू निर्मिती सावंत यांच्या सूनेच्या भूमिकेत आहे. 'झिम्मा २'मध्ये तिने तानिया हे पात्र साकारलं आहे. तर निर्मिती सावंत निर्मलाच्या भूमिकेत आहेत. 'झिम्मा २'साठी रिंकूने ही पोस्ट केली आहे. 

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २'मध्ये रिंकू आणि निर्मिती यांच्याबरोबर सुहास जोशी, शिवानी सुर्वे, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड चित्रपटांना तगडी टक्कर देत आहे. 

टॅग्स :रिंकू राजगुरूमराठी चित्रपट