Join us

'जब सैंया आए शाम को..."गंगुबाई काठियावाडी'च्या गाण्यावर रिंकूने दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 17:30 IST

Rinku rajguru: या व्हिडीओमध्ये ती गुंगाबाई काठियावाडी या चित्रपटातील गाण्यावर मनमोहक एक्स्प्रेशन्स देताना दिसत आहे. 

आर्ची होऊन प्रेक्षकांच्या मनावर सैराटपणे राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. सैराट, कागर, मेकअप आणि आता झुंड अशा कितीतरी चित्रपट, वेबसीरिजच्या माध्यमातून रिंकू प्रेक्षकांच्या भेटीला आली. उत्तम अभिनयशैली आणि पडद्यावर वावरताना तिच्यातील साधेपणा यामुळे रिंकू अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यामुळे आज तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतं. अलिकडेच रिंकूने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

कलाविश्वाप्रमाणेच रिंकू सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय असते. यात अनेकदा ती तिचे व्हिडीओ, फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलिकडेच तिने 'झुंड'मधील तिचे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहिल्यावर नेटकऱ्यांना सैराटमधील आर्ची आठवली होती. त्यानंतर आता तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती गुंगाबाई काठियावाडी या चित्रपटातील गाण्यावर मनमोहक एक्स्प्रेशन्स देताना दिसत आहे. 

रिंकूने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती 'जब सैंया आए शाम को...'या गाण्यावर एक्स्प्रेशन्स देताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी तिच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य, डोळ्यांच्या हरकती यामुळे ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूझुंड चित्रपटसेलिब्रिटीसिनेमा