Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही मराठी अभिनेत्री सूर्यास्ताचा फोटो शेअर करत म्हणाली - मै,मेरी तनहाई और..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 16:36 IST

प्राजक्ता छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे.

प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या. प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे कुटुंबियांचे फोटो, चित्रीकरणाच्यावेळेसचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने सोशल मीडियावर नुकताच एका फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्राजक्ता हातात चाह घेऊन मावळत्या सूर्यकडे पाहता बसली आहे. मै,मेरी तनहाई और मसाला चाय बस्स...असं या फोटोला प्राजक्ताने कॅप्शन दिले आहे.

सध्या प्राजक्ता छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने लकडाउन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. तसेच तिने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत असल्याचेही सांगितले.लकडाउन या चित्रपटात प्राजक्ता माळीसोबत अभिनेता अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळी