Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्राजक्ताने चाहत्यांवर केलं 'ब्लॅक मॅजिक'; व्हिडीओ पाहून म्हणाल, 'आज जाने की जी़द ना करो..।'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 15:50 IST

Prajakta mali: प्राजक्ताने तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे.

प्रत्येक मराठी प्रेक्षकाच्या घरात पोहोचलेलं नाव म्हणजे प्राजक्ता माळी. उत्तम अभिनेत्री असलेल्या प्राजक्ताने व्यावसायिका आणि उद्योजिका म्हणून सुद्धा लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये ती कायम चर्चेत असते. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रीय असून नुकताच तिने एक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

प्राजक्ता सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्यामुळे तिच्या आयुष्यातील लहानमोठे किस्से, प्रसंग ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात नुकतंच तिने एक व्हिडीओशूट केलं आहे. हा व्हिडीओ तिने व्हॅनिटी व्हॅनमध्ये शूट केला असून तो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

प्राजक्ताने काळ्या रंगाच्या साडीमध्ये व्हिडीओशूट केलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने , 'आज जाने की जी़द ना करो..।', असं कॅप्शन दिलं आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी तिच्यावर कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

दरम्यान अभिनेत्री अमृता खानविलकरनेही प्राजक्ताच्या व्हिडीओवर ब्लॅर मॅजिक असं म्हणत कमेंट केली आहे. तर, अन्य सेलिब्रिटी आणि चाहत्यांनीही या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पाडला आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळीटेलिव्हिजनटिव्ही कलाकारसिनेमा