Join us

कडाक्याच्या उन्हात झाडाखाली निवांत बसलीय प्राजक्ता; फार्महाऊसमध्ये घेतेय सुट्टीचा आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 17:40 IST

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री.

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताला आपण विविध मालिका, सिनेमा आणि वेबसिरीजमधून अभिनय करताना पाहिलंय. प्राजक्ता सध्या मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये. प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अशातच प्राजक्ताच्या एका पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

प्राजक्ताचं कर्जतमध्ये फार्महाऊस आहे. याचे फोटो ती कायम शेअर करत असते. नुकतेच तिनं प्राजक्तकुंजमधील काही खास फोटो शेअर केले होते. यामध्ये प्राजक्ता तिच्या फार्महाऊसमधील गार्डनमध्ये बसलेली दिसून येत आहे. या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, 'मालिकीनबाई प्राजक्तकुंजवरील सगळ्या arrangements पाहत, मान्सूच्या स्वागतात बसल्या आहेत'. या फोटोंमध्ये प्राजक्ताने पांढऱ्या रंगाचं शर्ट परिधान केलेला दिसून आला. 

गेल्यावर्षी प्राजक्ताने 'प्राजक्तकुंज' हे रिसॉर्ट विकत घेतलं. कर्जतमध्ये असणारं हे अलिशान रिसॉर्ट निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे. हे फार्महाऊस घेण्यासाठी प्राजक्ताला दागिने गहाण ठेवावे लागले होते.  कर्जतमधील गौळवाडी या गावात प्राजक्ताचं फार्महाऊस आहे. या फार्महाऊसमध्ये ३ बेडरूम्स, हॉल, किचन  स्विमिंग पूल या सगळ्या गोष्टींची सोय आहे. प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचं सूत्रसंचालन करताना दिसतेय. 

टॅग्स :प्राजक्ता माळीसेलिब्रिटीमराठी अभिनेताकर्जत