Join us

सुख म्हणजे नक्की काय असतं? प्राजक्ता माळीला ‘उत्तर’ सापडलं...! बघा व्हिडीओ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 16:05 IST

Prajakta Mali : प्राजक्ता सतत नवनव्या पोस्ट शेअर करत असते. सध्या तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडियावर किती अ‍ॅक्टिव्ह आहे, हे नव्यानं सांगायची गरज नाही. प्राजक्ता सतत नवनव्या पोस्ट शेअर करत असते. सध्या तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. होय, सुख म्हणजे नक्की काय असतं, याचं उत्तर प्राजक्ताला सापडलं आहे. तिचं उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला बातमीसोबतचा व्हिडीओ बघावा लागणार आहे.व्हिडीओत प्राजक्ता तिच्या भाच्यांसोबत मस्तपैकी आंब्यांवर ताव मारतेय. या व्हिडीओत तिच्या दोन भाच्या आंबे खाताना दिसत आहेत.   तुला अजून काय हवं, असं प्राजक्ता एका भाचीला विचारते, यावर ती आंबा असं उत्तर देते.  तुला आंबा आवडतो का? असा प्रश्न प्राजक्ता करते,त्यावर   खूप आवडतो, असं उत्तर ती देते.  

या व्हिडीओला प्राजक्ताने दिलेलं कॅप्शन लक्षवेधी आहे. ‘सहकुटूंब सहपरिवार, स्वत:च्या बागेत बसून, ह्या पिल्लांना (भाच्यांना), रसाळ  हापूस आंब्यांवर ताव मारताना बघणं आणि स्वत:ही नंतर आडवा हात मारणं म्हणजे...सुख म्हणजे नक्की काय असतं ; ह्याचं उत्तर सापडणं आहे’, असं तिने लिहिलं आहे. सोबत उन्हाळ्याचीसुटीचा फिल, माळ्यांचीबाग, माळ्यांच्यापोरी आणि त्यांचं आम्रप्रेम असे हॅशटॅगही दिले आहेत.

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ता माळीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारे सौंदर्य, दिलकश अदा आणि लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ता अल्पावधीतच रसिकांची आवडती अभिनेत्री बनलीये. सोशल मीडियावर प्राजक्ता प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ ती सतत शेअर करत असते. प्राजक्ता   नुकतीच पावनखिंड या सिनेमात दिसली होती.काही दिवसापूर्वी तिनं आईसोबत परदेश वारी केली. याचे फोटो देखील प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केले होते.

टॅग्स :प्राजक्ता माळी