Join us

'3 महिन्यातून एकदा या गोष्टी कराव्याच लागतात'; प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 10:49 IST

अभिनेत्री प्राजक्ता माळी नुकतीच श्रीश्री रवीशंकर यांच्या आश्रमात गेली होती. तिनं पोस्ट शेअर करत ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली.

अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajakta Mali)ने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच प्राजक्ताने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. जी चर्चेत आली आहे. 

अभिनेत्री प्राजक्ता माळी नुकतीच श्रीश्री रवीशंकर यांच्या आश्रमात गेली होती. तिनं पोस्ट शेअर करत ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली. आर्ट ऑफ लिविंगचा अडवान्स कोर्स करण्यासाठी गेलेल्या प्राजक्तानं नुकतंच तिचा कोर्स पूर्ण झाल्याची माहिती दिली. 

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, "प्राणायम, योग, मेडिटेशन, म्युझिक, सात्विक लिविंग, सात्विक अन्न, पंचकर्म, निसर्ग आणि बरंच काही, या गोष्टी 3 महिन्यातून एकदा अनिवार्य आहेत", असं प्राजक्तानं म्हटलं आहे.

वर्कफ्रंटबद्दल...मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी हे नाव कायमच आघाडीवर असते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुरुवातीच्या काळात काही मालिकेत काम करून प्राजक्ता घराघरात पोहोचली. फक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचेही स्वप्न तिने पाहिले आणि ते स्वप्न सत्यात उतरवले. मालिका, चित्रपट, वेबसिरीज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ताने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या शोमधील तिच्या लूकची बऱ्याचदा चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटाबद्दल सांगायचं तर प्राजक्ता शेवटची लकडाउन चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अकुंश चौधरी मुख्य भूमिकेत झळकली आहे. 

टॅग्स :प्राजक्ता माळी