Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्राजक्ता गायकवाड नव्या भूमिकेत; 'साजनी'मधून जिंकतीये प्रेक्षकांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 17:30 IST

Prajakta gaikwad: आज अबालवृद्धांपासून प्रत्येक वयोगटात प्राजक्ताचा चाहतावर्ग आहे. प्राजक्ता अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये झळकली. परंतु, यावेळी ती एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आली आहे.

"स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज" या मालिकेत महाराणी येसूबाई ही भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड(prajakta gaikwad). या मालिकेत प्राजक्ताने वठविलेल्या भूमिकेच्या प्रेमात आजही प्रेक्षक असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आज अबालवृद्धांपासून प्रत्येक वयोगटात तिचा चाहतावर्ग आहे.  या मालिकेनंतर प्राजक्ता अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये झळकली. परंतु, यावेळी ती एका म्युझिक अल्बमध्ये झळकल्याचं दिसून येत आहे.

प्राजक्ताची मुख्य भूमिका असलेला साजनी हा म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या अल्बममध्ये पहिल्यांदाच प्राजक्ता एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर सादर झाली आहे.

"हे गाणं अतिशय सुंदर आहे. ऐकायला खरंच खूप छान आहे. याचे म्युझिक बिट्स गाणे ऐकणाऱ्याला गुणगुणायला लावतात. आणि, हे गाणं जर सकाळी ऐकलं तर खूप फ्रेश वाटेल कारण या गाण्याचे म्युझिक खूप प्लेजेंट आहे", असं प्राजक्ता म्हणाली. प्राजक्ता सोबत या गाण्यात नवोदित अभिनेता सिद्धांत तुपे झळकला असून त्याचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. 

 दरम्यान, या आधी ऐतिहासिक भूमिकेत  पहायला मिळणारी प्राजक्ता आता या गाण्यात नॉर्मल लुकमध्ये दिसतेय. प्राजक्ताच्या वाढदिवशी ६ ऑक्टोबरला या गाण्याचा टीझर लाँच झाला होता. त्यानंतर आता हे गाणं प्रेक्षकांना युट्युब, मायबोली चॅनेलवर पाहायला मिळणार आहे.  

टॅग्स :प्राजक्ता गायकवाडसेलिब्रिटीटेलिव्हिजन