Join us

'तुझं वर्णन करायला शब्दही अपुरे'; प्राजक्ताच्या सोज्वळ लूकवर चाहते फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 17:40 IST

Prajakta Gaikwad:'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad). आपल्या साध्या सोज्वळ स्वभावामुळे प्राजक्ताने अल्पावधीत लोकप्रिय मिळवली. त्यामुळे सोशल मीडियावर वरचेवर तिची चर्चा रंगत असते. सध्या नेटकऱ्यांमध्ये तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्राजक्ताने अलिकडेच एक फोटोशूट केलं होतं. यापैकी काही निवड फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्राजक्ताने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. सोबतच साडीत दिसतेस तू जशी नभातील अप्सरा अशी सुंदरा…तुझा आहे जबरदस्त तोरा !, असं कॅप्शनही तिने दिलं आहे. प्राजक्ता या साडीत प्रचंड सुंदर दिसत आहे. 'तुझं वर्णन करायला शब्दही अपुरे' असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर कमेंटचा पाऊस पाडला आहे.

दरम्यान,  'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. तसंच या मालिकेनंतर ती 'नांदा सौख्यभरे', 'संत तुकाराम' या मालिकेत काम केलेय. सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ मालिकेत प्राजक्ता गायकवाड मुख्य भूमिकेत होती. पण काही वादांमुळे तिला मालिकेतून काढून टाकण्यात आले. 

टॅग्स :प्राजक्ता गायकवाडसेलिब्रिटीटेलिव्हिजन